Vidhansabha Election 2024 : भाजपची पहिली यादी : मराठवाड्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी, तर विद्यमान सगळे आमदार पुन्हा रिंगणात!

Two new faces in BJP's first list, another chance for most existing MLAs : मराठा-ओबीसीमधील आरक्षणाच्या संघर्षाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात भाजपला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी `नो रिस्क` धोरण स्वीकारत बहुतांश विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
BJP Marathwada Assembly Election News
BJP Marathwada Assembly Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP Political News : भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी अखेर आज जाहीर झाली. मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आली असून फक्त भोकर आणि फुलंब्री या दोन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित 14 विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहेत.

राजस्थानचे राज्यपाल तथा माजी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना तर नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. (BJP) सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीचा दारुण पराभव झाला होता. आठ पैकी सात लोकसभेचे मतदारसंघ महायुतीच्या हातून गेले. ऐकमेव छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले होते.

भाजपचा मराठवाड्यात एकही खासदार निवडून आला नव्हता. मराठा-ओबीसीमधील आरक्षणाच्या संघर्षाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात भाजपला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी `नो रिस्क` धोरण स्वीकारत बहुतांश विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला पारंपारिक भोकर विधानसभा मतदारसंघ मुलगी श्रीजया हिच्यासाठी सोडवून घेतला आहे.

BJP Marathwada Assembly Election News
BJP Vs Congress: भाजपचा हल्लाबोल, काँग्रेसवर मोठी नामुष्की, थेट ट्विट डिलीट करण्याची आली वेळ; 'हे' आहे कारण

तर फुलंब्रीत हरिभाऊ बागडे यांची राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या फुलंब्रीमध्ये भाजपच्या माजी जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. (Marathwada) हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारस कोण ठरणार? यासाठी मोठी स्पर्धा पक्षामध्ये लागली होती. त्यात अनुराधा चव्हाण यांनी बाजी मारली.

संभाजीनगर पुर्व- अतुल सावे, भोकरदन- संतोष दानवे, गंगापूर- प्रशांत बंब, जिंतूर- मेघना बोर्डीकर, केज- नमिता मुंदडा, हिंगोली-तान्हाजी मुटकुळे यांना अपेक्षेप्रमाणे पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडी आपले पत्ते कधी उघडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

BJP Marathwada Assembly Election News
Marathwada Assembly Election 2024 : मराठवाड्यात दानवे, मुंडे, देशमुख, सत्तारांचा कस लागणार..

विशेष म्हणजे तासाभरापुर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात महत्वाची घोषणा केली. त्यानंतर काही मिनिटात भाजपची पहिली यादी जाहीर झाली. एकूणच भाजपने विधासभेची उमेदवारी देतांना मराठवाड्यात कुठलाच नवा प्रयोग न करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

हे भाजपचे उमेदवार

1. किनवट- भीमराव केराम

2. भोकर - श्रीजया चव्हाण

3. नायगाव- राजेश पवार

4. मुखेड- तुषार राठौड

5. हिंगोली- तान्हाजी मुटकुळे

6. जिंतुर - मेघना बोर्डीकर

7. परतूर- बबनराव लोणीकर

8. बदनापूर- नारायण कुचे

9. भोकरदन- संतोष दानवे

10. फुलंब्री- अनुराधा चव्हाण

11.औरंगाबाद पुर्व- अतुल सावे

12. गंगापूर - प्रशांत बंब

13. केज- नमिता मुंदडा

14. निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर

15. औसा- अभिमन्यू पवार

16. तुळजापूर- राणाजगजीतसिंह पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com