Uddhav Thackeray : देशाला कुणी लुटलं, काँग्रेस की भाजपनं? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला 'पब्लिक'चं भन्नाट उत्तर

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : 70 वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले: ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : गेल्या 70 वर्षांत काँग्रेसने देशाला लुटल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे मंत्री सातत्याने करतात. मात्र, निवडणूक रोख्यांचा वापर करून भाजपने काही वर्षांतच सात-आठ हजार कोटी जमवले, तर काँग्रेसला आतापर्यंत फक्त आठशे कोटी जमवता आले आहेत. मग देशाला कुणी लुटलं, भाजप की काँग्रेस, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. यावर समोर उपस्थित पब्लिकमधून भन्नाट प्रतिसाद मिळाला.

औसा येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसह मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी त्यांनी भाजपकडे असलेल्या संपत्तीचा उल्लेख करत देशाला भाजपनेच लुटल्याचा आरोपही केला. ठाकरे म्हणाले, काँग्रेसने देशाला मोठ्या प्रमाणात लुटल्याचा आरोप भाजपचे नेते करतात. आता गेल्या दहा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. या सत्तेच्या काळात भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून तब्बल सात ते आठ हजार कोटींची माया जमवली. काँग्रेसकडे मात्र फक्त सात-आठशे कोटीच आहेत, मग देशाला कुणी जास्त लुटले? भाजप की काँग्रेसने, असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला. यावर समोर उपस्थित काही नागरिकांनी काँग्रेस तर काहींनी भाजप असे संमिश्र उत्तर दिले. ठाकरेंच्या या प्रश्नाला मिळालेले संमिश्र उत्तर राजकीय वर्तुळात चवीने चर्चेले जात आहे.

Uddhav Thackeray
Sunil Shelke News : रोहित पवारांचं नाव घेत सुनील शेळकेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान, म्हणाले...

काँग्रेसने सत्तेच्या काळात देशाला लुटले. तसेच जे काँग्रेसने केले नाही ते आम्ही करून दाखवले, असा दावाही भाजपच्या (BJP) वतीने केला जातो. याची खिल्लीही ठाकरेंनी उडवली. ते म्हणाले, काँग्रेसने 70 वर्षांत फक्त सात-आठशे कोटीच जमवले. तुम्ही मात्र सात-आठ हजार कोटी जमवले. त्यामुळे भाजप म्हणते ते खरेच आहे. जे काँग्रेसला जमले नाही ते गेल्या पाच-दहा वर्षांतच भाजपने करून दाखवले. आजचा महाराष्ट्र हा गुजरातमधून चालवला जातो, असाही घणाघात ठाकरेंनी केला.

भाजपच्या व्हिजन 2047 चाही ठाकरेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) राज्यात वारंवार येतात आणि सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे आहे, असे सांगतात. 2047 मध्ये आपला देश जगातील सर्वात जास्त बलवान देश असेल, असे चित्र लोकांसमोर ठेवतात. बसा बोंबलत, 2047 ला किती वर्षे आहेत. ते साल तुम्ही तरी पाहणार आहात का, आता काय देणार यावर बोलत नाहीत. राज्यातील शेतकऱ्यांच्या ताटात दोन घास खायला नाहीत, 2047 साल घाल तुझ्या उरावर. गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्यांचे हात रिकामे ठेवण्याचे काम सरकार करत असल्याची टीका ठाकरेंनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uddhav Thackeray
Nanded Lok Sabha Constituency : चव्हाणांची शिफारस अन्‌ फडणवीसांची शिष्टाई खतगावकरांना उमेदवारीची भेट देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com