Shivsena News : उद्धव ठाकरेंना ओम राजेनिंबाळकरांकडूनही शुभेच्छा; पोस्ट कायम ठेवणार की डिलिट करणार?

Uddhav Thackeray birthday wishes News : ऑपरेशन टायगरनंतर शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Omraje Nimbalkar Vs Uddhav Thackeray
Omraje Nimbalkar Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावर देशातील जेन झींनी केलेले आंदोलन आणि त्यातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली होती, यामध्ये तरुणांचाही समावेश होता.

या वाढदिवासाची चर्चा आणखी एका कारणाने होत आहे, ती म्हणजे शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा आणि खासदार संजय जाधव यांनी आधी केलेली पोस्ट नंतर डिलिट केली म्हणून. ऑपरेशन टायगरनंतर शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे ओम राजेनिंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दोघांनीही आपल्या 'फेसबुक' आणि 'एक्स' या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून पोस्ट केल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या. त्याही पेक्षा जास्त या पोस्टचा त्रास झाला तो शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, असेही बोलले जाते. कारण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ती पोस्ट अवघ्या काही तासातच डिलिट केली.

Omraje Nimbalkar Vs Uddhav Thackeray
Sanjay Raut: 'बेईमानीचा कीडा घेऊन आलेल्यांच्या जाण्याचं दुःख कशाला?' सचिन अहिरांवर संजय राऊतांचा घणाघात

आता धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केलेल्या पोस्टचे नेमके काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेकडून दोन टर्म खासदार राहिलेले ओम राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खासदार म्हणून ओळखले जात होते. ते कदापी त्यांची साथ सोडणार नाही, असा दावा केला जात होता. पण तो फोल ठरला आणि ऑपरेशन टायगरचे तेही शिकार झाले. परंतु उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर कितीही टीका केली तरी आपण त्याला उत्तर देणार नाही, उलट त्यांच्यावर टीका करणार नाही, ही मराठवाड्यातील तीनही खासदारांनी घेतलेली भूमिका अनेकांना भावली.

आतापर्यंत ओम राजेनिबाळकर, जाधव, आष्टीकर हे त्यावर ठामही आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपली कुठलीही तक्रार नाही, असेही पक्ष सोडताना या तीनही खासदारांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर सोडता दोघांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या.

ओम राजेनिंबाळकर यांनी फेसबुकवर पावणे पाच वाजता, तर एक्सवर दुपारी अडीच वाजता शुभेच्छा संदेश देणारी पोस्ट टाकली, ती अद्यापही कायम आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्ट डिलिट केल्या आहेत. जाधव यांना कोणाचा निरोप आला होता का? ओम राजेनिंबाळकर काय करणार? यावर आता चर्चा झडत आहेत.

Omraje Nimbalkar Vs Uddhav Thackeray
Sanjay Jadhav : पक्ष बदलला पण ठाकरेंशी निष्ठा कायम; 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदाराच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com