Dasara melava| मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर यंदा पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून शिंदे गटाकडून मेळाव्याला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिंदे गटाने ३ लाख लोक गोळा करण्याचे नियोजन केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यास सांगितले आहे.
मुंबईत हे दोन मेळावे होत असताना आता बीडच्या भगवान गडावरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मोठा दसरा मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यांवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, तुम्ही कोणाचं भाषण ऐकणार? असा सवाल विचारला असता त्या म्हणाल्या की, '' मी दोघांचंही भाषण ऐकणार आहे. मी दोघांच्याही मेळाव्याकडे कुतूहलाने बघत आहे. आज खऱ्या अर्थाने दोघांच्याही सीमोल्लंघनांचा दिवस आहे. जनतेच्या प्रश्नांचं, विषयांचे सीमोल्लंघन करतील, जनतेच्या मनाला हात घालतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पण माझा मेळावा शहरातल्या मोठ्या मेळाव्यांसारखा नाही. इथे मोठी व्यवस्था नाही, खुर्च्या नाहीत, जेवणाची सोय नाही, पण गेल्या अनेक वर्षापासून लोक इथे येत आहेत. जेवणाचा डबाही घरुनच घेऊन येताच. माझा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, तो वंचितांचा आहे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.
संपूर्ण राज्याचे लक्ष आता दसरा मेळाव्यांकडे लागेल आहे. पहिल्यांदाच शिवसेना (Shiv Sena) फुटून दोन मेळावे होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच नियोजन ठाकरेंकडूनही करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.