Uddhav Thackeray Speech : 'होय... मी आदित्यला मुख्यमंत्री करेन'; ठाकरेंनी अमित शाहांना ललकारले!

Uddhav Thackeray On Amit Shah : माझे आजोबा प्रबोधनकार आणि वडील हिंदुहृदयसम्राट या देशात लोकांच्या हितासाठी त्यांची घराणेशाही होती.
Uddhav Thackeray Specch
Uddhav Thackeray SpecchSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : आमचं हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चूल पेटवणारे आहे. मात्र, भाजपचं हिंदुत्व मात्र घरे पेटवणारे आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम भाजप करत आहे. सर्व जातीतील धर्मातील लोकांनी एकत्र येऊन, पूर्ण एकजुटीने भाजपच्या हुकूशाहीला हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. (Latest Marathi News)

शिवाजीराव मोरे क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या वेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार दिनकर माने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबा पाटील, मकरंदराजे निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हा सचिव आश्लेष मोरे, तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, रज्जाक अत्तार, बाबूराव शहापुरे, सुधाकर पाटील, अजिंक्य पाटील, अजित चौधरी आदींची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी दानवे, खासदार राऊत, ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे यांनीही आपल्या भाषणातून भाजपवर प्रहार केला. आमदार ज्ञानराज चौगुले यांचाही समाचार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतला. विशेष म्हणजे, या सभेच्या ठिकाणी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडून ठाकरेंचा सत्कार करण्यात आला.

होय मी आदित्यला मुख्यमंत्री करेन -

"देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सतत घराणेशाहीवर बोलत असतात. माझे आजोबा प्रबोधनकार आणि वडील हिंदुहृदयसम्राट या देशात लोकांच्या हितासाठी त्यांची घराणेशाही होती. शाह-मोदींचं कर्तृत्व असे काय? अशा शब्दांत टीका ठाकरेंनी केली. होय मला तुमची जनतेची साथ असेल तर आदित्यला मुख्यमंत्री करेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com