BJP Political News : भाजपच्या शहर कार्यकारिणीत केंद्रीय मंत्री कराडांची बहीण अन् चिरंजीव...

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यात भाजपचे केंद्र आणि राज्यात मिळून तीन मंत्री आहेत.
BJP Political News
BJP Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : अवघ्या दोन वर्षांत राज्यसभेवर निवड आणि थेट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेल्या डाॅ. भागवत कराड यांचे नशिब फळफळले. पक्षात छोटी-मोठी पदं आणि प्रदेश उपाध्यक्ष, महापालिकेचे महापौर ते थेट मंत्री असा कराडांचा वेगवान प्रवास सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. (BJP News) आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड हेही पक्षात सक्रिय होताना दिसत आहेत.

BJP Political News
Maharashtra Loksabha Constituency : शिंदे गटाच्या तेरा खासदारांना मिळणार उमेदवारी, इतर मतदारसंघांत काय ?

नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Dr.Bhagwat Karad) शहर-जिल्हा सरचिटणीसपदी हर्षवर्धन कराड यांना नियुक्ती देण्यात आली आहे. (BJP) जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर शहर कार्यकारिणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यात स्थान मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात लाॅबिंग झाल्याचेही बोलले जाते.

जिल्ह्यात भाजपचे केंद्र आणि राज्यात मिळून तीन मंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच आपल्या समर्थकांची वर्णी कार्यकारिणीत लागावी, यासाठी मंत्र्यांनी आपले वजन वापरले असणार. (Marathwada) हर्षवर्धन कराड यांची निवड याच राजकीय वजनातून झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शहर-जिल्हा सरचिटणीस पदावर निवड झाल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी चिरंजीव हर्षवर्धन यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पदाला न्याय देऊन माझे कर्तव्य मी संपूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असा शब्द या भेटीत त्यांनी आपल्या वडिलांना दिला. भाजपच्या शहर कार्यकारिणीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डाॅ. भागवत कराड, राज्यातले मंत्री अतुल सावे यांच्या समर्थकांना संधी देण्यात आली आहे. काही नावांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून थेट नियुक्त्या देण्यात आल्याचीही चर्चा आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता भाजप नेत्यांनी सगळ्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.

७ सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहे, यात समीर राजूरकर, हर्षवर्धन कराड, राजेंद्र साबळे, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, अमृता पालोदकर, दीपक ढाकणे यांचा समावेश आहे. तर १३ उपाध्यक्षामध्ये डाॅ. उज्ज्वला दहिफळे, राजू बागडे, जगदीश सिद्ध, मनीषा भन्साळी, नितीन चित्ते, संजय चौधरी, अमित देशपांडे, अशोक दामले, राजेश मेहता, अशोक दामले, गणेश नावंदर, सुनील जगताप, जयश्री किवळेकर यांचा समावेश आहे. ११ सचिव, १ कोशाध्यक्ष, सदस्य ७६ , निमंत्रित सदस्य १५, युवामोर्चा शहराध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, ओबीसी, कामगार, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com