केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड म्हणतात, यंदाचा अर्थसंकल्प `बुस्टर डोस` ठरेल..

कोरोनानंतर देशाची अर्थ व्यवस्था पुर्णपणे सावरली असून पुढील वर्ष हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरणार असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. (Dr.Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad
Dr.Bhagwat KaradSarkarnama

औरंगाबाद : कोरोना संकटानंतर हळूहळू का होईना पुर्वपदावर येत असलेली अर्थव्यवस्था पाहता यंदाचे बजेट कसे असेल याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Budget) राज्यसभेवर नियुक्ती आणि वर्षभरात केंद्रीय अर्थराज्यमंत्री झालेले डाॅ.भागवत कराड (Dr.Bhagwat karad) यांचा त्या खात्याचे मंत्री म्हणून हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. (Aurangabad) अर्थसंकल्प सादर होण्याआधीच तो `बुस्टर डोस`, असेल असे शुभसंकेत कराड यांनी दिले आहेत. (Marathwada)

आपल्या फेसबुक पेजवरून यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल त्यांनी थोडक्यात आणि नेमके भाष्य केले आहे. स्वातंत्र्यानंतर औरंगाबादला केंद्रात महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. केंद्रात सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालन्याला दोन राज्यमंत्रीपद मिळाली आहेत.

कराड यांच्याकडे अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे. केंद्रातील यंदाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत सादर करण्याची संधी डाॅ. भागवत कराड यांना राज्यमंत्री म्हणून मिळणार आहे.

औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून या बजेटकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्तपुर्वी कराड यांनी यंदाचे बजेट कसे असेल याची थोडक्यात कल्पना फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

Dr.Bhagwat Karad
`निवडणूकीसाठी बायको पाहिजे`, बॅनरची महिला आयोगाकडून दखल; अहवाल मागवला

कोरोनानंतर देशाची अर्थ व्यवस्था पुर्णपणे सावरली असून पुढील वर्ष हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरणार असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. देशाच्या अर्थचक्राला अधिक गती देण्याासाठी यंदाचा अर्थसंकल्प नक्कीच बुस्टर डोस ठरेल, अशी अपेक्षाही कराड यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com