

औरंगाबाद : महापालिका निवडणुक लढवता यावी म्हणून आधाची विवाहित आणि तीन आपत्य असलेल्या एका महाशयाने उमेदवार बायको पाहिजे , असे बॅनर औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या मध्यवस्तीत लावले होते. (Ncp) या बॅनरची राज्यभरात चर्चा झाली, यावर काही संतप्त प्रतिक्रिया देखील उमटल्या. (Rupali Chakankar) भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बॅनरला काळे फासत ते फाडत या वृत्तीचा निषेधही केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील संबंधित बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
हे बॅनर महिलाचा अवमान करणारे असून हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केलेआहे. औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात `निवडणूक लढण्यासाठी बायको पाहिजे` असे बॅनर दोन दिवसांपुर्वी लावण्यात आले होते.
रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने हे बॅनर लावले. महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून राजकारणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या या महाशयाचे लग्न झालेले असून त्याला आधी दोन आपत्ये होती. लाॅकडाऊनमध्ये एक मुलगी झाल्यामुळे आता मला तीन आपत्ये आहेत. त्यामुळे निवडणूक लढवता येत नाही.
परंतु आपल्या घरातील कुणीतरी राजकारणात असावे, अशी माझी प्रबळ इच्छा आहे.त्यामुळे मी लग्नासाठी बायको शोधतो आहे, जेणेकरून तिच्याशी लग्न करून तिलाच निवडणूकीत उतरवून निवडून आणण्याचा आपला मानस असल्याचे या पाटीलने म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.