Sambahji Patil-Ashok Patil Nilangekar : केंद्रात वजन वापरा, अन् पाणीप्रश्न सोडवा; दिशाभूल करू नका, पुतण्यावर काकांची टीका...

Congress News : खरिपातील पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, LaturSarkarnama

Marathwada Political News : केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपले राजकीय वजन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जवळ वापरून पाण्याच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घ्यावा. (Latur Political) जिल्हाभर जलसाक्षरता रॅली काढून जनतेची दिशाभूल थांबवावी, अशी टीका काका अशोक पाटील निलंगेकर यांनी पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केली.

Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Who is heir of Ashok Chavan : पक्षाने लोकसभेची गळ घातली, तर भोकरमधून अशोक चव्हाण मुलगी श्रीजयाला `लिफ्ट` देणार ?

मराठवाड्याला चार मुख्यमंत्री मिळाले. मात्र, पाण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून संभाजी निलंगेकर (Sambahji Patil Nilangekar) करत आहेत. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनाचे जनक म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लोअर तेरणा धरणाच्या माध्यमातून निलंगा शहराला पिण्याचे पाणी आणले. ८५ किमीचा डावा व उजवा कालवा आणला, जिल्ह्यातच नव्हेतर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी जलस्रोत निर्माण केले आहेत.

यामध्ये जायकवाडी, विष्णुपुरी, माजलगाव येथील सिंदफणा धरण, तेरणा, मांजरा, गोदावरी, आदी नद्यांवर अनेक ठिकाणी बॅरेजेस बांधून जल- सिंचनाची सुविधा तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या. (Latur) लातूर जिल्ह्यात तावरजा, धनेगाव, घरणी, मसलगा, गिरकचाळ, साकोळ अशा विविध ठिकाणी बॅरेजस निर्माण करून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. (Congress) सध्या जिल्ह्यात लोखर तेरणा धरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी निलंगा, उमरगा, औसा, लोहारा, तुळजापूर, धाराशिवला पाणी तसेच ३२ खेडी व १२ खेडी योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना पिण्याचे पाणी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या दूरदृष्टी धोरणांमुळेच मिळत आहे.

तर उदगीर व अहमदपूरला लिंबोटी व बनशेळकी धरणातून पाणी मिळते. एवढी सुविधा असताना लातूर शहराला पाणीच आणायचे असेल तर स्व. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना उजनी धरणातून लातूरला १२ टीएमसी पाणी आणण्याचे निश्चित केले होते. ते आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे आवाहन अशोक पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

कै. निलंगेकर साहेबांनी आपल्या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणची सर्व कार्यालय निलंगा येथे आणली होती. दोन आमदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे तालुक्यातील कार्यालये पळवली जात आहेत. सध्या मतदारसंघात दुष्काळ पडला आहे. पाऊस पडत नसल्याने खरिपातील पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com