Ramesh Bornare : भुमरेंना लीड देत आमदार बोरनारे ठरले भारी; विधानसभेचे तिकीट फायनल?

Ramesh Bornare News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात बोरनारे सहभागी झाले आणि त्यांच्याविरोधात तालुक्यात संतापाची लाट पसरली.
ramesh bornare | sandipan bhumre
ramesh bornare | sandipan bhumresarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 12 June : शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या विधानसभेच्या वैजापूर मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत प्रा. रमेश बोरनारे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

दिवंगत माजी आमदार आर. एम. वाणी यांना आपले राजकीय गुरु मानणारे बोरनारे ( Ramesh Bornare ) यांना वैजापूरमधून शिवसेनेची उमेदवारी आणि विजय वाणी यांच्या पुण्याईनेच मिळाला.

पण, राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणात दोन वर्षापुर्वी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात बोरनारे सहभागी झाले आणि त्यांच्याविरोधात तालुक्यात संतापाची लाट पसरली. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाले, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना-भाजप युतीचा कारभार राज्यात सुरू झाला.

शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर पन्नास 'खोके' घेऊन गद्दारी केल्याचे आरोप झाले. यात आमदार रमेश बोरनारे यांना वैजापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. जेव्हा बोरनारे यांच्यावर गद्दारीचा आरोप झाला तेव्हा तेव्हा त्यांनी याचा हिशोब जनता करेल, असे म्हणत विकासासाठी आपण शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

ramesh bornare | sandipan bhumre
Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेला इम्तियाज जलील यांना लीड, आमदार प्रदीप जयस्वाल डेंजर झोनमध्ये...

अर्थात वैजापूर तालुक्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून भरपूर निधीही आणला. गद्दार विरुद्ध एकनिष्ठ अशा लढतीचा फैसला करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली. महायुतीने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आणि जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री, आमदार, नेत्यांना त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली.

वैजापूरमध्ये आमदार बोरनारे यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली होती. एकीकडे विरोधकांचा प्रचार तर दुसरीकडे तो मोडून काढत भुमरेंना मताधिक्य मिळवून देण्याचे उदिष्ट. महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून दिले नाही, तर विधानसभा उमेदवारी देतांना याचा विचार केला जाईल, असा दम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आधीच भरला होता.

त्यामुळे मतदान होऊन निकाल हाती येईपर्यंत महायुतीच्या मंत्री, आमदारांचा जीव टांगणीला लागला होता. संभाजीनगरमधून संदीपान भुमरे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आणि विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी समोर आली. यात ग्रामीणमध्ये गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे आघाडीवर होते.

बोरनारे यांनी वैजापूरमधून संदीपान भुमरे यांना तब्बल 93231 मते मिळवून दिली. तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना 56207 इतकी मते मिळाली. म्हणजे भुमरे यांना तब्बल 37 हजाराहून अधिक मतांची लीड बोरनारे यांनी मिळवून दिली.

ramesh bornare | sandipan bhumre
Abdul Sattar Vs Raosaheb Danve : लोकसभेचा पंगा विधानसभेला महागात पडणार, दानवे सत्तारांचा वचपा काढणार?

बोरनारे यांनी मतदारंसघात आपला असलेला पराभव यातून दाखवून दिला. भुमरेंना लोकसभेला लीड मिळवून दिल्याने बोरनारे यांचे वैजापूर मधून विधासभेचे तिकीटही फायनल झाले, अशी चर्चा होताना दिसते आहे. ठाकरे गटाला मात्र वैजापूरमध्ये अधिक मजबुतीने संघटनात्मक बांधणी करावी लागणार हे यावरून स्पष्ट झाले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com