Ambadas Danve On Valmik Karad : वाल्मीक कराड जेलमधून चालवतो नेटवर्क; धनंजय मुंडेंचा त्याला सपोर्ट! माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीला आला होता फोन..

Valmik Karad Backed by Dhananjay Munde, Running Network from Jail: Ambadas Danve : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींशी मुंडे यांचा असलेला संबंध पाहता त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, अशी मागणी केली जात आहे.
Ambadas Danve On Walmik Karad News
Ambadas Danve On Walmik Karad NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : कृषी साहित्य खरेदी प्रकरणात कोर्टाने क्लीन चीट दिल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावरून प्रतिक्रिया उमटत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचाच सपोर्ट असल्याचा आरोप केला आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला वाल्मीक कराडचा जेलमधून फोन आला होता, असा दावाही दानवे यांनी केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या प्रकरणातून आधी अपहरण आणि मग हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड ( Walmik Karad) याचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या खात्यामार्फत करण्यात आलेल्या कृषी साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशीही सुरू होती. हायकोर्टाने कृषी साहित्य खरेदी प्रकरणात मुंडे यांना क्लीन चीट दिली.

धनंजय मुंडे यांच्यासाठी हा दिलासा असला तरी त्यांची मंत्रिमंडळात परतण्याची वाट काही सुकर झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींशी मुंडे यांचा असलेला संबंध पाहता त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचाच पाठिंबा असल्याचे सांगत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप केले.

Ambadas Danve On Walmik Karad News
Walmik Karad NCP : वाल्मिक अजूनही झळकतोय बॅनरवर; यामागे अजितदादांचे पदाधिकारी, धनंजय देशमुखांनी दिले पुरावे

कृषी साहित्य खरेदी प्रकरणात धनंजय मुंडे यांना हायकोर्टाने क्लीनचीट दिली असली तरी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींशी त्यांचे संबंध कायम आहेत. वाल्मीक कराड हा जेलमधून केवळ बीडच नाही तर राज्यातील विविध शहरातील आपले नेटवर्क वापरतो आहे. एकदा माझ्यासमोर बसलेल्या व्यक्तीलाच वाल्मीक कराड यांचा जेलमधून फोन आला होता. मला हे कळाल्यावर धक्काच बसला. फोन आला त्या व्यक्तीचे नाव मी सांगणार नाही. पण धनंजय मुंडे यांचा वाल्मीक कराडला पाठिंबा आहे, हे मी याआधीही सांगीतले आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

यापुर्वी विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने वाल्मीक कराड याने जेलमधून 42 सराईत गुन्हेगारांना जामीन मिळवून देत बोहर काढल्याचा आरोप केला होता. तसेच हेच गुंड बीड जिल्ह्यात आणि राज्यातील विविध भागात वाल्मीक कराड याच्यासाठी काम करतात, असा दावा बांगर याने केला होता. त्यानंतर अंबादास दानवे यांनीही वाल्मीक कराड जेलमधून नेटवर्क चालवत असल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com