Bala Bangar-walmik karad news Beed
Bala Bangar-walmik karad news BeedSarkarnama

Bala Bangar On Walmik Karad : धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून वाल्मीकला आमदार अन् मंत्री व्हायचे होते! बाळा बांगरकडून मोठा दावा..

Valmik Karad Wanted to Replace Dhananjay Munde as MLA and Minister, Says Bal Bangar :माझा वाद पत्नीसोबत आहे, मी काही चुकीचे केले नाही. आता तुम्ही रेकाॅर्डींग बाहेर काढलेच आहे, तर यानंतर अनेक रेकाॅर्डिंग बाहेर निघतील.
Published on

Beed Political News : विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीचे वाल्मीक कराड याच्याशी झालेल्या संभाषणाची आॅडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाली. यात बांगर आपल्याला नांदवायला नेत नाहीत, तुम्ही त्याला समजावून सांगा नाहीतर प्राॅपर्टीचा अर्धा हिस्सा द्यायला सांगा, असे संभाषण आहे. ही आॅडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर बाळा बांगर यांनी वाल्मीक कराड याच्या संदर्भात खळबळजनक दावे केले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांना बाजूला करून वाल्मीक कराड याला परळीतून आमदार आणि पुढे मंत्री व्हायचे होते, असा दावा बाळा बांगर यांनी केला.

धनंजय मुंडे, राजश्री वहिनी यांच्याबद्दल वाल्मीक कराड याचे काय विचार होते, त्या दोघांना त्याला आयुष्यातून उठवायचे होते, याचा आॅडिओ मी धनंजय मुंडे यांच्याकडे पाठवून देणार आहे, त्यांनी तो ऐकावा, असे सांगत रॅकोर्डिंगचा खळे वाल्मीक कराडने (Walmik Karad) सुरू केला आहे, आता मी त्याच सगळंच बाहेर काढणार, अशा इशारा बांगर यांनी माध्यमाशी बोलताना दिला. माझा वाद पत्नीसोबत आहे, मी काही चुकीचे केले नाही. आता तुम्ही रेकाॅर्डींग बाहेर काढलेच आहे, तर यानंतर अनेक रेकाॅर्डिंग बाहेर निघतील. मी काही चुकीचे वागलो असेल तर महाराष्ट्रचं काय? देश सोडून जाईल, असेही बांगर यांनी म्हटले आहे.

महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड यांच्या मुलाने आणि त्याच्या गुंडांनी केल्याचा आरोप करत विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी खळबळ उडवून दिली होती. महादेव मुंडे यांची हत्या देखील सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच क्रूरपणे करण्यात आल्याचे सांगत महादेव मुंडे यांच्या गळ्याच्या मासाचा तुकडा म्हणून वाल्मीक कराड याच्यासमोर ठेवण्यात आल्याचा दावा बांगर यांनी केला होता. (Dhananjay Munde) पुढे महादेव मुंडे यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही त्यांच्या गळ्यावर खोलवर जखम असल्याचे स्पष्ट झाले होते. बाळा बांगर यांच्या आरोपांमुळे वाल्मीक कराड आणखी अडचणीत आला.

Bala Bangar-walmik karad news Beed
Walmik Karad : महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणातील 'आय विटनेस'ला वाल्मीक कराडने संपवले! बाळा बांगर यांचा नवा आरोप..

तर कृषी खात्यातील साहित्य खरेदी प्रकरणात क्लीन चीट मिळूनही महादेव मुंडे प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. वाल्मीक कराड याच्या समर्थकांकडून बाळा बांगर व त्याच्या पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप व्हायरल करण्यात आली. त्यानंतर बांगर यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहे. मात्र यावर आक्रमक झालेल्या बांगर याने वाल्मीक कराड याच आता आपण सगळंच काढणार, असे सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Bala Bangar-walmik karad news Beed
Walmik Karad NCP : वाल्मिक अजूनही झळकतोय बॅनरवर; यामागे अजितदादांचे पदाधिकारी, धनंजय देशमुखांनी दिले पुरावे

धनंजय मुंडे यांना बाजूला करून वाल्मीक कराड यालाच परळी मतदरासंघातून आमदार व्हायचे होते. निवडून आल्यावर मंत्री होण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता. वाल्मीक कराड याचे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्याबद्दलचे विचार काय होते? तो काय बोलत होता, याच्या अनेक रेकाॅर्डिंग माझ्याकडे आहेत. त्या मी आता धनंजय मुंडे साहेबांकडे पाठवणार आहे. त्या त्यांनी ऐकाव्यात, असेही बांगर म्हणाले. एकूणच बाळा बांगर वाल्मीक कराड याच्याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com