Vasmat Assembly Constituency : टक्केवारीला जनता कंटाळली, आता बदल घडवा : जयप्रकाश दांडेगावकर

मतदारसंघात मागील पाच वर्षात केवळ टक्केवारी वाढली, माफीया वाढले. कार्यकर्त्याला मोठे करण्याऐवजी घरातील व्यक्तीला काम या प्रकारामुळे सामान्य नागरीक, कार्यकर्ता कमालीचा नाराज आहे
Vasmat Assembly election 2024 jayprakash dandegaonkar over changes that people need from political leader
Vasmat Assembly election 2024 jayprakash dandegaonkar over changes that people need from political leader
Published on
Updated on

वसमत : मतदारसंघात मागील पाच वर्षात केवळ टक्केवारी वाढली, माफीया वाढले. कार्यकर्त्याला मोठे करण्याऐवजी घरातील व्यक्तीला काम या प्रकारामुळे सामान्य नागरीक, कार्यकर्ता कमालीचा नाराज आहे, अशी टीका करीत टक्केवारीत आपली कारकीर्द पूर्ण करणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

वसमत मतदारसंघातील नहाद बोरीसावंत, पिंपराळा, करंजाळा अशा विविध गावांत त्यांनी भेटी देत मतदारांसोबत संवाद साधला. यावेळी अ. हाफीज अ. रहेमान, राजू इंगोले, अंबादासराव भोसले, दौलत हुंबाड, सत्यनारायण बोखारे, श्याम कदम, अमोल मुळे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी वाजतगाजत रॅली काढली, तर महिलांनी औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मिळणारा अभुतपूर्व प्रतिसाद पाहून उर्वरित उमेदवार धास्तावले आहेत. गावागावांत जाऊन दांडेगावकर हे ग्रामस्थांसोबत संवाद साधत विचारपूस करीत आहेत. अनेक जुने सहकारी त्यांच्या सोबतीला आहेत.

आडगाव, हट्टा, बोरी, पिंपराळा आदी गावांतील तरुणांनी देखील दांडेगावकर यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. यावेळी बोलताना दांडेगावकर म्हणाले, की प्रत्येक गावात प्रचारानिमित्त जात असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. सर्वांना बदल हवा आहे, गेली पाच वर्षे मतदारसंघात झालेली टक्केवारी कुणालाच नकोय.

मी सर्वांसोबत बोलून माझे मतदारसंघाबाबतीत असलेले ध्येय व धोरणे अधोरेखित करीत आहे. त्याची अंमलबजावणी येणाऱ्या पाच वर्षात नक्की करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. पक्ष फोडाफोडीमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सर्वसामान्य नागरिक पवार साहेबांच्या पाठीशी आहेत, हे दिसून येत असून, त्यांना हे सरकार बदलायचे आहे असे दिसून येते. ज्येष्ठ, तरुण, महिला अशा सर्व जनतेचा मिळणारा पाठिंबा वरील सर्व गोष्टी अधोरेखित करीत आहे. या दौऱ्यानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की, येणारा काळ जनतेचा असेल, येथील शेतकऱ्यांचा असेल, महाविकास आघाडीचा असेल.

त्यामुळे येणाऱ्या २० नोव्हेंबरला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यमान आमदारांनी घरातील व्यक्तींनाच देऊन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम पाच वर्षात केले आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज होऊन माझ्याकडे आले आहेत.

प्रत्येक योजना, कामांत टक्केवारीमुळे मतदारसंघात एक वाईट संदेश गेला आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. तर दुसरे माजी आमदार गेलेत एका पक्षात अन् फोन करीत आहेत दुसऱ्या पक्षाला. त्यामुळे त्यांची काड्या करण्याची सवय गेली नसल्याचे दिसून येत आहेत, अशा शब्दात दांडेगावकर यांनी विरोधकांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com