

पंजाब नवघरे
Vasmat Municipal Council : गोवंश डांबून ठेवल्या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सर्वत्र टिकेची झोड उठल्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांनी अखेर मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अली यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे.
वसमत ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळा खंदारबन शिवारात 19 गोवंश सापडले होते. त्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात उपनगराध्यक्ष इमरान अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत निर्दयीपणे उपाशी ठेवून गोवंशाची कत्तल करण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांना तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
पोलिसांच्या चौकशीमध्ये इमरान अली यांनी संबंधित शेत शेख जाकेर याला खंडून दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शेख जाकेर याच्याविरुध्दही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर संपूर्ण तालुक्यात इमरान आली यांच्यावर टीका झाली. त्यांच्या अटकेच्या आणि राजीनामाच्या मागणीसाठी वसमत शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादीकडून उपनगराध्यक्ष म्हणून इम्रान अली यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हा प्रकार घडला. चोहोबाजूंनी टीका आणि पक्षाकडूनही राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यामुळे अखेर बुधवारी त्यांनी राजीनामा दिला.
इम्रान अली यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्याकडे दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. आता नवीन उपनगराध्यक्ष कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इमरान अली हे आमदार राजू नवघरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात आता आमदार राजू नवघरे कोणाला संधी देतात? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.