

Vilas Ghule murder case latest update : विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेल्यानंतर रमेश घुले यांनी नुकतीच तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटी आणि तपासा दरम्यान, विलास घुले यांची हत्या होण्याआधी आणि त्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपूत्र सौरभ सोनवणे याला आरोपींकडून तब्बल 57 फोन काॅल गेले गेल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हत्या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. रविवारी मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पुणे येथील सीआयडी कार्यालयात जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदारपुत्र सौरभ सोनवणे याच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले.
त्यांच्या दाव्यानूसार हत्याकांडाच्या आधी आणि नंतर आरोपींनी सौरभ सोनवणेला तब्बल ५७ फोन केले आहेत. सीडीआर अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे, असा दावा रमेश घुले यांच्याकडून करण्यात आला आहे. रमेश घुले यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली आहे.
हत्येच्या वेळी उपचारादरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर विलास घुले यांना भूल दिली गेली, ज्यामुळे त्यांचा रक्तदाब अचानक कमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणात डॉक्टरांनाही सौरभ सोनवणे व आरोपींचे फोन आल्याचा संशय असून त्यांच्याही चौकशीची मागणी रमेश घुले यांनी केली.
विलास घुले यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी मंदिरात बैठक झाली होती आणि डम्प डेटावरून इतर संशयितांचे लोकेशन तिथेच असल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासदार पूत्र सौरभ सोनवणेला सहआरोपी करून अटक करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंब आक्रमक झाले आहे. आता सीआयडी या 57 कॉल्सच्या दाव्यानंतर काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीसांनी यापुर्वीच पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव नोंदवले आहे. परंतु त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबिय आग्रही आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.