Dhnanjay-Pankaja Munde News : `जवाहर`, साठी मतदान सुरू, मुंडे बहिण-भाऊ पुन्हा आमने-सामने...

Marathwada : जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या ३२ संचालकांच्या निवडीसाठीची मतदान प्रक्रिया सुरू आहे.
Dhnanjay-Pankaja Munde News
Dhnanjay-Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याकाळापासून एकहाती वर्चस्व असलेल्या परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. पंकजा मुंडे- धनंजय मुंडे हे बहिण भाऊ दोघेही बिनविरोध निवडून आले असले तरी त्यांच्या दोन पॅनलमध्ये मात्र वर्चस्वसाठीची लढाई सुरू आहे. भगवान गडावर एकत्रित आल्यानंतर या दोघांकडून कडवटपणा कमी करण्याचा संकल्प घेण्यात आला होता.

Dhnanjay-Pankaja Munde News
Sanjay Shirsat On Ajit Pawar : मी त्यांच्या पक्षाचा नाही म्हणून निधी नाकारला होता, तरी अजित पवार चांगला माणूस..

जवाहर शिक्षण संस्थेवर धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर दोघांमधील दुरावा कमी झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र पंकजा मुंडेची (Pankaja Munde) बिनविरोध निवड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एका भाषणात केलेल्या विधानानंतर या दोघांमधील राजकीय संघर्ष यापुढेही सुरूच राहणार हे स्पष्ट झाले होते.

नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने बीड जिल्ह्यात बाजी मारली. (Parli) त्यानंतर आज जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या ३२ संचालकांच्या निवडीसाठीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, या निवडणूकीत १३ वर्षानंतर पहिल्यांदाच मतदान होत आहे.

धनंजय मुंडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदारांशी संवाद साधला. या निवडणुकीत १ हजार ३२१ मतदार हे ३२ संचालकांसाठी मतदानाचा हक्क बजावत आहेत. परळील सर्वात मोठ्या जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत मुंडे बहीण भावांमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार तसेच मतदारांशी त्यांनी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर आता जवाहर शिक्षण संस्थेवरही धनंजय मुंडे ताबा मिळवणार ? की मग मतदार पंकजा मुंडे यांचेच नेतृत्व स्वीकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com