आम्ही जमीन विकणारे नाही, वाचवणारे ; खोटं बोलणाऱ्या बागडेंनी राजीनामा द्यावा..

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयांचा भाव असलेल्या २५ एकर जमिनीचा ताबा सोडण्याचा निर्णय कृऊबामध्ये भाजपची सत्ता असताना संचालक मंडळाने घेतला होता. (Congress)
Haribhau Bagde-Kalyan kale
Haribhau Bagde-Kalyan kaleSarkarnama

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता असताना १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. (Marathwada) स्वतःचे घोटोळे झाकण्यासाठी जिन्सीच्या जमीन विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा कांगावा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) करत आहेत, असा आरोप कॉंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी (ता. २१) केला.

खोटे आरोप करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सी येथील जमीन विक्रीत मोठा भ्रष्टाचार झाल्याच आरोप हरिभाऊ बागडे यांनी विधीमंडळात डॉ. कल्याण काळे यांचे नाव घेता केला होता. त्यावर सोमवारी पत्रकार परिषद घेत काळे यांनी प्रत्यूत्तर दिले.

ते म्हणाले, जिन्सीच्या जमिनीच्या विक्रीची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने भाजपचे संचालक मंडळ असतानाच झालेली आहे. प्रशासकांनी केवळ चार हजार ५०० चौरस मिटर जागेची रजिस्ट्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे बागडे यांनी केलेल्या आरोपत कुठलेही तथ्य नाही. विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहात खोटे आरोप करणाऱ्या बागडेंनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

बागडे यांच्या आरोपानंतर सहकार राज्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या चौकशीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सध्या पणन महासंघाकडे चौकशी सुरू आहे. त्यामुळे एकाच प्रकरणाची दोन ठिकाणी चौकशी करता येणार नाही. जुन्या चौकशीत काय तथ्य समोर येईल, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आदेश थोरात यांनी काढल्याचे कल्याण काळे यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयांचा भाव असलेल्या २५ एकर जमिनीचा ताबा सोडण्याचा निर्णय कृऊबामध्ये भाजपची सत्ता असताना संचालक मंडळाने घेतला होता. त्याचा न्यायालयात पाठपुरावा करून आता या जमिनीच्या सातबाऱ्यावर बाजार समितीचे नाव लावून घेतले आहे. त्यामुळे आम्ही जमिनी विक्री करणारे नव्हे तर वाचविणारे आहोत, असा दावा काळे यांनी केला.

Haribhau Bagde-Kalyan kale
Abdul Sattar : शिवसेना भगवी आणि हिंदुत्ववादीच, तुमच्या झेंड्यातील हिरव्याचे काय ?

भाजपच्या काळातच घोटाळा

ही जमीन सोडण्याचा ठराव घेताना काय सेटलमेंट झाली होती? हजारो कोटींची जमीन हे बिल्डरांच्या घशात घालत होते. प्रशासक आल्यानंतर ही जमीन वाचली, असा दावा काळे यांनी केला. करमाड येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलातून फक्त दोन कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. सात एकर जागेचा वापर करून हे व्यापारी संकुल उभारले. एका एकराचा भाव किमान सात कोटी आहे. हा कसला व्यवहार आहे?

बाजार समितीत भाजपची सत्ता असताना किमान १०० कोटीचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच कारवाई देखील होईल, असा दावा काळे यांनी केला. प्रशासक येण्यापूर्वी सहा-सात महिन्यात एक कोटी १४ लाख बाजार समितीचे उत्पन्न होते. प्रशासकांच्या काळात दोन कोटी ४७ लाख रुपये तिजोरीत जमा झाले. हे पैसे कुठे जात होते? असा सवालही काळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com