बीड : राजकीय लोकांच्या श्रीमंती, त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि मिळकतीचे साधन याबाबत अनेक गॉसिप असतात.(Ncp) कागदपत्रांवर काही, चर्चा वेगळ्या आणि वास्तव तिसरेच असते. पण, आम्ही गरिब माणसं असे बहुतेक लोकप्रतिनिधी म्हणत असतात.(Beed) मात्र, राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी मात्र स्वत:च्या श्रीमंतीच राज अगदी पत्रकार परिषदेत जाहीर करुन टाकले.
पिढ्यानजात श्रीमंत असून जेव्हा वडिलांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा आमच्या कुटूंबाकडे पाच हजार एकर जमिन होती. आम्ही जमिनदार होतो, पिढ्यान पिढ्याची श्रीमंती याला म्हणतात असेही त्यांनी निक्षून सांगीतले. नंतर ती जमिन सिलींगमध्ये गेली. तरीही आजही आमच्याकडे दोनशे एकर जमिन असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले.
श्रीमंती कशाला म्हणायच हेही सांगून त्यांनी राजाभाऊ मुंडेच्या श्रीमंतीबाबत आणि उत्पन्नाच्या साधनाबाबत प्रश्न विचारला. घडले असे सध्या जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीवरुन रणकंद सुरु आहे. वडवणी नगर पंचायतीची निवडणुक राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
सध्या भाजपचे नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांचे नगर पंचायतीवर वर्चस्व आहे. दोन्ही गटांकडून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होत्या. त्यात राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे माजी संचालक बाबरी मुंडे यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाच्या खर्चावरुन सोळंके यांनी टिका केली.
त्याला उत्तर देताना आम्ही वाढदिवस साजरा केला तर काय बिघडले? आमदार सोळंके व पुतणे जयसिंह सोळंके सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मल्याचे बाबरी मुंडे म्हणाले. त्याला पुन्हा एका पत्रकार परिषदेत प्रकाश सोळंके यांनी उत्तर दिले.
वाढदिवस साजरा करा पण १५ लाख रुपये खर्च असतो का, आणि हा पैसा आला कोठून असाही प्रश्न उपस्थित करत राजाभाऊ मुंडे यांच्या उत्पन्नाचे साधन नेमके काय, राजकारण सोडून काहीच साधन नसल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.
तसेच स्वत:च्या श्रीमंती बाबतही त्यांनी उघड माहिती दिली. प्रकाश सोळंके हे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे चिरंजीव आहेत. दिवंगत सोळंके हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी १३ वर्षे राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले.
माजलगाव प्रकल्प, माजलगाव कारखाना अशी अनेक कामे सुंदरराव सोळंके यांनी केली. वकिलीचे शिक्षण घेतलेले दिवंगत सोळंके एकदा गेवराई विधानसभा मतदार संघातूनही बिनविरोध आमदार झाले होते. सोळंके कुटूंब मुळचे मोहखेड (ता. धारुर) तालुक्यातील आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.