Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : आम्ही लोकांच्या मनाची चोरी करतो, उद्धवजी तर जनादेशचोर आहेत! फडणवीसांचा ठाकरेंना टोला..

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray, saying they won people’s love while Uddhav stole the public mandate : भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेवर या लोकांचा अजिबात विश्वास नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाला समोर ठेवून तयार झालेल्या निवडणूक आयोगाने त्यांना 4 पत्र पाठवली.
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

सुशांत सांगवे

Latur News : आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो. त्यांच्या मनाची चोरी करतो. म्हणून लोक आम्हाला भरभरून मतदान करतात. पण, उद्धवजी यांनी तर जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेशचोर आहेत. म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले आहे. लोकशाहीमध्ये कसे वागायचे, हे जनादेशचोरांनी आम्हाला शिकवू नये. ते स्वत: जानदेशचोर आणि त्यांचे चेलेचपाटे कफनचोर आहेत. कोविड काळात त्यांच्या सहकाऱ्यांनी कफन चोरले. त्यातही पैसा कमवला. म्हणून उद्धव ठाकरे यांना कफनचोरांचे सरदार म्हणायचे का? अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लातूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोनल सुरू आहे. या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री हे चीप मिनिस्टर नसून थीप मिनिस्टर आहेत. ते चोरांचे सरदार आहेत’, अशी टीका केली. यावर फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले. तसेच, हा जनआक्रोश नव्हे तर त्यांचा मनआक्रोश आहे, अशा शब्दांत आंदोलनाची खिल्ली उडवली. उद्धवजी यांची सत्ता गेली, खुर्ची गेली पण, मन मानत नाही. म्हणून त्यांचा मनआक्रोश सुरू आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

खोटं बोलायचं अन्‌ पळून जायचं

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित केलेल्या 'वोट चोरी’ या मुद्यावर आणि दिल्ली येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या आंदोलनावर फडणवीस यांनी भाष्य केले. भारतीय संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर या लोकांचा अजिबात विश्वास नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाला समोर ठेवून तयार झालेल्या निवडणूक आयोगाने त्यांना आत्तापर्यंत 4 पत्र पाठवली.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : दिल्लीतील तमाशा 'लांछनास्पद', भाजप स्वतःवरील संकटांची सावरसावरी करतोय; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तुम्ही जे सांगत आहात तेच येथे येऊन प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून सांगा. पण, त्यांच्यात हिंमत नाही. ते जात नाहीत, पुरावेही देत नाहीत. याचा अर्थ ते पळपुटे लोक आहेत. दररोज खोटं बोलायचं अन्‌ पळून जायचं, हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्याजवळ कसलेच पुरावे नाहीत. त्यांचा दररोज पराभव होत आहे. तो सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com