ज्यांना ३२ हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी

इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय सचिव असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही. (Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde-Pankaja Munde

Dhnanjay Munde-Pankaja Munde

Sarkarnama

Published on
Updated on

बीड : 'आम्हाला नाव ठेवली जातात, कुवत काढली जाते पण आम्ही गरीब माणसं आहोत. पण ज्यांनी पूर्वी चार - चार खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना ३२ हजाराने नाकारले, त्यांची कुवत काय असावी, असा प्रतिटोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी भाजपच्या (Bjp) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना लगावला.

त्या देशाच्या भाजच्या सचिव आहेत, स्थानिक आमदार व खासदारही भाजपच्या असताना निवडणुकीत कमळ गायब असल्याचे कोणीतरी अमित शहा यांना सांगावे, असा चिमटाही मुंडे यांनी केजच्या प्रचार सभेत काढला.

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के जनतेशी थेट संबंधित असलेले व समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला कमी लेखणे म्हणजे प्रत्यक्ष महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यासारखे आहे.

माजी मंत्री पंकजा यांनी माझ्यावर, माझ्या पक्षावर टीका करावी. मात्र, माझ्याकडे असलेल्या वंचितांना न्याय देणाऱ्या या खात्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये, असे धनंजय मुंडे म्हणाले. एका सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक न्याय हे ३२ नंबरचे खाते असून यामार्फत ते लोकांना काहीही देऊ शकत नाहीत, अशी टिका केली होती. त्याचा मुंडे यांनी समाचार घेतला.

ज्यांना लोकांनी ३२ हजारांनी नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. केज नगर पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची अजब युती आहे.

इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय सचिव असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही, हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत कुणीतरी पोहचवा, असेही मुंडे यांनी सुनावले.

<div class="paragraphs"><p>Dhnanjay Munde-Pankaja Munde</p></div>
पठ्ठ्या कुठंय? दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख

दरम्यान ३२ नंबर वाले १०० कोटी देतो म्हणून घोषणा करत आहेत अशा आशयाची टीका करणा-या माजी मंत्री आणि खासदार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मागायला पुढे का आल्या नाही, असा सवाल उपस्थित केला.

तसेच यावेळी त्यांनी अतिवृष्टी अनुदानापोटी जिल्ह्यात मिळालेले ५०२ कोटी रुपये, सोयाबीन अग्रीम २५ टक्के विम्याचे १९२ कोटी रुपये तसेच सध्या सुरू असलेल्या खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपाची आकडेवारीच जाहीर सभेत सांगितली.

आम्ही शब्द देतो आणि दिलेला प्रत्येक शब्द पाळतो, केज नगर पंचायतीच्या माध्यमातून ऐतिहासिक असलेल्या केज शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देतो, असे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com