जानकरांच्या मनात काय चाललय? ठाकरे सरकारचे केले कौतुक

भाजप आणि काॅंग्रेसला ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा आरोप करत हे दोन पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका देखील जानकर यांनी केली आहे. (Mahadev Jankar)
Mahadev Jankar-Rsp

Mahadev Jankar-Rsp

Sarkarnama

Published on
Updated on

औरंगाबाद ः देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले रासपचे महादेव जानकर सध्या मात्र भाजपवर चांगलेच नाराज दिसत आहेत. पकंजा मुंडे यांचे समर्थक आणि भाऊ म्हणून ओळखले जाणारे जानकर (Mahadev Jankar) पंकजा यांच्यावर झालेल्या अन्यायमुळे देखील भाजपशी अंतर राखून असल्याचे दिसून आले आहे. (Bjp) आपल्या राष्ट्रीय पक्षाची राज्यात ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मध्यंतरी दौरे देखील केले.

राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर तर त्यांचा भाजपवरील राग अधिकच वाढलेला दिसतोय. ओबीसी आरक्षणाच्या (Obc Resrvation) मुद्यावरून त्यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि सत्ताधारी काॅंग्रेस (Congress) पक्षावर टीका केली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या दोन पक्षांवर निशाणा साधत भाजप आणि काॅंग्रेसला ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा आरोप केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असेल्या काॅंग्रेसवर जानकरांनी निशाणा साधला असला तरी शिवेसना आणि राष्ट्रवादीबाबत मात्र त्यांनी काहीच म्हटलेले नाही. जानकरांनी भाजपवर टीका केली असली तरी ठाकरे सरकारचे मात्र कौतुकच केल्याचे यावरून स्पष्ट होते. जानकरांचे हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

पुण्यातील एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना जानकर यांनी एकीकडे भाजप व काॅंग्रेसवर तोंडसुख घेतले, तर दुसरीकडे कोरोना काळातील ठाकरे सरकारचे काम चांगले असल्याचे सांगत शाबसकी देखील दिली. ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाल्यानंतर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष उडाला.

याच मुद्यावरून भाजप सोबत असलेले काही घटक पक्ष आणि त्यांचे नेते देखील दुरावले. त्यापैकीच एक नाव म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर. भाजप आणि काॅंग्रेसला ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा आरोप करत हे दोन पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका देखील जानकर यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Mahadev Jankar-Rsp</p></div>
काकांनी दिलेला शब्द पुतण्याने खरा केला; शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने पाच लाखांचे कर्ज..

आगामी पुणे महापालिका निवडणुका पाहता जानकरांच्या रासप देखील या निवडणुकीत उतरणार अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारचे कौतुक जानकरांनी केल्यामुळे नेमकं त्यांच्या मनात चाललय तरी काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com