Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पेटलेला आहे. या आरक्षणावरून राज्यभर आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी नेतेमंडळींना गावबंदी करण्यात आली आहे.
राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. त्याचा फटका नेतेमंडळींना बसत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे आले असता मराठा आंदोलकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवले.
माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला काळे झेंडे दाखवून काय उपयोग. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजुने आहोत, ज्यांनी हे पाप केलय त्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackrey) यांना काळे झेंडे दाखवा, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawnkule) बुधवारी हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुळजापुर शहरातील मराठा आंदोलकर्त्यानी काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी जमलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करीत मार्ग काढला.
(Edited by Sachin Waghmare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.