औरंगाबाद ः लोकसभा निवडणुकीत माझ्यामुळे एमआयएम आली अशी बोंब मारणाऱ्यांनो ओवीसी मोंदीचा कोण लागतो? असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी भाजपला केला आहे. मोदी गेल्यानंतर तुम्हाला कोण वाचवेल, अशी जाहीर धमकी देऊन देखील ओवेसीवर (Aimim Owasi) कारवाई का होत नाही? मुळात ओवेसी आणि भाजप (Bjp) हे एकच आहेत, एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू असल्याचा आरोपही जाधव यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातू केला.
ओवीसी यांचे एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. योगी, मोदी आज आहेत, ते कायम पंतप्रधान, मुख्यमंत्री राहणार नाहीत, मग तुम्हाला कोण वाचवणार? असा सवाल एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी यांनी नुकतेच केले होते. या विधानाचा दाखला देत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपच्या नेत्यांवर आगपाखड केली आहे.
लोकसभा निवडणुकीत माझ्यामुळे एमआयम निवडून आली अशा बोंबा मारल्या, पण एमआयएम निवडून आली ती प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या कृपेने. एकीकडे भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकता किंवा त्यांच्या मागे ईडी लावता. मग असदोद्दीन ओवेसी जाहीरपणे हिंदूना धमक्या देतो, वाटेल ते बोलतो त्याच्यावर कारवाई का होत नाही?
पोलिस त्याला हात का लावत नाही? ओवोसी मोदींचा कोण लागतो? ही सगळी तुमंची नाटक लोकांच्या लक्षात आली आहेत. मोदींनी ओवीसीला ठोकले नाही, तर उद्या लोक तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे. आज राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये आहे, सत्ताधारी पक्षाचा एक आमदार, मंत्री भाजप विरोधात बोलायला तयार नाही, कारण त्याला ईडी मागे लागेल, जेलमध्ये टाकेल अशी भिती वाटते.
छगन भुजबळ यांच्यापासून माझ्या सारख्या अनेकांना जेलमध्य जावे लागले, कारण फक्त भाजपच्या मंत्र्यांशी खेटलो म्हणून. मग ओवेसी उघडपणे हिंदूना भिती दाखवतो, मग हा मोदींचा विरोधक आहे की प्रचारक हेच समजत नाही. पण निवडणुकीत ही तुमची सगळी नाटंक लोकांच्या लक्षात येतील. त्यामुळे मोदींनी ओवेसीला ठोकलं नाही, तर लोक तुम्हाला ठोकतील, याचा पुनरुच्चार देखील जाधव यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.