Ashok Chavan On Reservation : आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटविण्यासाठी घटना दुरुस्ती का करत नाही ?

Congress News : आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासूनही घटनात्मक संरक्षण दिले जाते; मग हाच न्याय मराठा आरक्षणाला का मिळत नाही?
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या गाजतोय. महाराष्ट्र विशेषतः महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. (Congress News ) केद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवावी, अशी मागणी करणारा ठरवा काॅंग्रेस कार्यसमितीच्या हैदराबाद येथील बैठकीत करण्यात आला.

Ashok Chavan News
Sambhaji Patil Nilangekar Rally: मराठवाड्यातून चार मुख्यमंत्री तरी पाण्यासाठी हाल; निलंगेकरांची जलसाक्षरता रॅली...

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्यासाठी केंद्र सरकार घटना दुरुस्ती का करत नाही? असा सवाल केला आहे.

लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते. (Marathwada) आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देताना संसदेत घटना दुरुस्ती केली जाते. (Congress) या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासूनही घटनात्मक संरक्षण दिले जाते.

मग हाच न्याय मराठा आरक्षणाला का मिळत नाही? आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटविण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती का केली जात नाही ? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी सरकारला केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांना समाजाचा विरोध पत्कारावा लागत आहे. नांदेडमध्येच अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्याविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला होता.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणामध्ये अडसर असणारी ५० टक्क्यांच्या मर्यादा हटवण्याची मागणी करत घटनेत दुरुस्ती का केली जात नाही? असा सवाल केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com