Latur Assembly Constituency 2024 : भाजपच्या पहिल्या यादीतून `लातूर शहर`,`ग्रामीण`ला का वगळले ?

Why was Latur city, rural excluded from BJP's first candidate list? : देशमुख बंधुंना निवडणूक सोपी जावी, असेच प्रयत्न केले जातात, कुमकुवत उमेदवार दिले जातात, असा आरोप विरोधकच नाही तर भाजपचे आमदारही करतात. अशावेळी पहिल्या यादीतून हे दोन मतदारसंघातून वगळ्याने संशय अधिक बळावला आहे.
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने काल जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केली. 99 उमेदवारांच्या या यादीत मराठवाड्यातील 16 मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या अनुक्रमे अमित देशमुख, धीरज देशमुख या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातील उमेदवार मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत. भाजपच्या पहिल्या यादीत या दोन मतदारसंघांना स्थान का देण्यात आले नाही? यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

निश्चितच भाजपची दुसरी यादी येणार आहे, परंतु काँग्रेसकडे असलेल्या (Latur) लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघाबाबात राज्याचे वरिष्ठ नेते निर्णय का घेऊ शकले नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. भाजप या दोन मतदारसंघामध्ये सेटलमेंट करते, असा आरोप सातत्याने केला जातो. देशमुख बंधुंना निवडणूक सोपी जावी, असेच प्रयत्न केले जातात, कुमकुवत उमेदवार दिले जातात, असा आरोप विरोधकच नाही तर भाजपचे आमदारही करतात.

अशावेळी पहिल्या यादीतून हे दोन मतदारसंघातून वगळ्याने संशय अधिक बळावला आहे. लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघावर काँग्रेसची पकड आहे. लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख सलग तीन वेळा निवडून आले आहेत. तर लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख हे गेल्या निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले आहेत. लातूर शहर मतदारसंघावर पुर्वी पासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
Latur City Assembly Constituency 2024 : अमित देशमुखांना पुन्हा बाय ? की महायुती तगडा उमेदवार देणार

अमित देशमुख यांच्याआधी त्यांचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांनी तब्बल सहा वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे. पैकी पाच वेळा ते विजयी झाले होते, तर 1995 मध्ये जनता दलाचे शिवाजी पाटील कव्हेकर यांनी त्यांचा पराभव केला होता. (BJP) 2008 नंतर या मतदारसंघाचे विभाजन होऊन लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन भाग झाले. आधीच्या लातूर शहरवर मजबुत पकड असलेल्या काँग्रेसने विभाजनानंतर लातूर ग्रामीणवरही ताबा मिळवला.

लातूर शहरमध्ये अमित देशमुख यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे, तर त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मध्ये गेल्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांनी 2009 मध्ये शिवसेनेच्या श्रीपाद कुलकर्णी यांना तर 2014-2019 या दोन निवडणुकीत भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा पराभव केला होता. या तीनही निवडणुकीत अमित देशमुख यांचे मताधिक्य मोठे होते.

Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh
BJP Releases First List: भाजपला बंडखोरीची भीती; 'गुजरात पॅटर्न' नको रे बाबा! विद्यमानांचा जीव पडला भांड्यात

तिकडे लातूर ग्रामीण मध्ये 2009 मध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकी काँग्रेसच्या वैजनाथ शिंदे यांनी भाजपच्या रमेश कराड यांचा पराभव केला होता. तर त्यानंतरच्या 2014 मध्ये भाजपच्या रमेश कराड यांना दुसऱ्यांदा पराभूत करत काँग्रेसच्या त्रिंबक भिसे यांनी विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले. पण यासाठी त्यांना भाजप व इतर विरोधकांचीच साथ मिळाल्याचे बोलले जाते.

भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली पण त्यांच्या सचिन देशमुख यांना साडे तेरा हजार आणि नोटाला साडे सत्तावीस हजार मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 13 हजार मते घेत धीरज देशमुख यांच्या विजयाला हातभार लावला होता. 1 लाख 21 हजार 482 एवढ्या प्रचंड मताधिक्याने धीरज देशमुख निवडून आले होते. आता महायुतीतील भाजपकडे या दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे. मात्र देशमुख भावांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते पहिली यादी जाहीर झाली तोपर्यंत घेऊ शकले नव्हते. दुसऱ्या यादीकडे या इच्छुकांच्या आता नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com