Hingoli Aseembly Constituency 2024 : भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली! तान्हाजी मुटकुळे यांची हॅट्र्रीक हुकणार ?

Will BJP MLA Tanhaji Mutkule's hat trick be lost in Hingoli assembly constituency? : विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्याला नाही तर किमान मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी बंद लिफाफ्यात त्याचे नाव कसे जाईल? याची काळजी घेतल्याचीही चर्चा होताना दिसते आहे.
MLA Tanhaji Mutkule News
MLA Tanhaji Mutkule NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli BJP Political News : लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. महायुतीने हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने अक्षरश बंड पुकारले होते. उमेदवार बदला नाहीतर पाडू, असा दमच स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भरला होता. बैठका, मेळावे घेत पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडले. पण एवढा अट्टाहास करून शेवटी महायुतीचा उमेदवार हरला.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली (Hingoli) भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. डझनभर इच्छुकांनी उमेदवारीवर दावा सांगितल्याने भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे टेन्शन वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव आणि विधानसभेसाठी सुरू झालेली स्पर्धा पाहता भाजप हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंद लिफाफ्यात नावे सुचवण्याचा फंडा भाजपने वापरला आहे, पण त्यातही अनेक नवी नावे समोर येत असल्याचे समजते. अशावेळी उमेदवारीचा तिढा भाजपचे नेते कसे सोडवणार? हा खरा प्रश्न आहे. विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्याला नाही तर किमान मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी बंद लिफाफ्यात त्याचे नाव कसे जाईल? याची काळजी घेतल्याचीही चर्चा होताना दिसते आहे.

MLA Tanhaji Mutkule News
Hingoli Assembly Election : हिंगोली विधानसभा निवडणुकीत काय होणार? उत्सुकता शिगेला...

शिवाजी मुटकुळे यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने इतर इच्छुकांनीही जोर लावला आहे. यात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न केलेले सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर, डॉ. विठ्ठल रोडगे यांची नावेही समोर आली आहेत. (BJP) या शिवाय तान्हाजी मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी खासदार शिवाजीराव माने, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते यांनीही जोर लावला आहे.

2014 मध्ये हिंगोली विधानसभेची जागा तान्हाजी मुटकुळे यांनी भाजपकडे खेचून आणली होती. 2019 मध्ये दुसऱ्यांदा मुटकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि ते पुन्हा निवडून आले. आता पक्ष त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देणार, की मग नव्या चेहऱ्याला संधी? हे लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com