Jalna Loksabha Constituency : सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या रावसाहेब दानवेंना पक्ष सहाव्यांदा उमेदवारी देणार ?

Jalna Political News : दोन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार होणे ही राजकारणात सोपी गोष्ट नाही.
Jalna Loksabha Constituency News
Jalna Loksabha Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada BJP News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. `पार्टी विथ डिफरन्स` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये घराणेशाही, नाती-गोती याला थारा नाही असे सांगितले जाते. (Jalna Political News) तसेच वय झालेल्या नेत्यांना मार्गदर्शकांच्या भूमिकेत पाठवण्याचा ट्रेंडही या पक्षात दिसतो. या ट्रेंडचा फटका महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या काही नेत्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसू शकतो.

Jalna Loksabha Constituency News
Imtiaz Jaleel On Nanded Incident : हे मृत्यू नसून खून आहेत; डीन, वैद्यकीय संचालक आणि मंत्र्यांवरही गुन्हे दाखल करा...

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर जालना, बीड, नांदेड आणि लातूरमध्ये भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत. (BJP) पैकी नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर, लातूरचे सुधाकर श्रृंगारे यांची पहिली, तर बीडच्या प्रीतम मुंडे यांची ही दुसरी टर्म आहे. तर जालन्याचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची ही पाचवी टर्म आहे. गावचे सरपंच ते केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री झालेल्या रावसाहेब दानवे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे.

दोन वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार होणे ही राजकारणात सोपी गोष्ट नाही. त्यात रावसाहेब दानवे हे धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. (Marathwada) जालना लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपल्यासमोर विरोधकच उभा होऊ दिला नाही, यातच त्यांचे कौशल्य दिसून येते. ग्रामीण बोली, मतदारसंघ आणि तेथील मतदारांशी जोडली गेलेली नाळ ही दानवे यांच्या राजकारणातील यशाची गुरुकिल्ली समजली जाते. देश-विदेशात कुठेही असले तरी मतदारसंघांत काय चालले? यावर दानवेंचे बारकाईने लक्ष असते.

त्यामुळे लोकसभा मतदारसंघावर मजबूत पकड असलेला त्यांच्यासारखा दुसरा नेता मराठवाड्यात सापडणार नाही. एवढ्या जमेच्या बाजू असल्या तरी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजप सहाव्यांदा त्यांना उमेदवारी देणार का? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत;पण या शंका उपस्थित होत असताना रावसाहेब दानवे यांना पर्याय कोण? याचे उत्तर सध्या तरी भाजपकडे नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुका होतील तेव्हा रावसाहेब दानवे ६९ व्या वर्षात पदार्पण करतील.

त्यामुळे सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि सातत्याने विजय मिळवणाऱ्या रावसाहेब दानवे यांना डावलणे पक्षाला शक्य होणार नाही. शिवाय हमखास निवडून येणारी जागा म्हणून जालना लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा दिल्लीच्या सत्तेत बसवण्याचे मिशन हाती घेतलेल्या भाजपकडून येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही जोखीम घेतली जाणार नाही, असेही बोलले जाते. त्यामुळे दानवेंना सहाव्यांदा उमेदवारी मिळण्यात त्यांची सत्तरी अडसर ठरणार नाही, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

Jalna Loksabha Constituency News
Parbhani BJP Politics : ठाकरे गटापासून दुरावलेल्या ब्राह्मण मतदारांवर भाजपचा डोळा...

शिवाय आता भाजप-शिंदे गटाच्या सोबतीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तिसरे इंजिन जोडले गेल्यामुळे दानवेंच्या सहाव्या विक्रमी लोकसभा विजयाचा मार्ग अधिक सोपा होण्याची शक्यता आहे. लोकसभा विजयातील दानवेंच्या सातत्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात कोणीही लढण्यास फारसे इच्छुक नाही. सत्तरीकडे वाटचाल करत असतानाही फीट असलेल्या दानवेंना भाजप पुन्हा उमेदवारी देऊन आपली एक सीट निश्चित करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com