ATS Action Mode : छत्रपती संभाजीनगरमधील महिलेचा देशविघातक कृत्यामध्ये सहभाग; 'एटीएस'कडून शोध सुरू

Chhatrapati Sambhajinagar Women searched by ATS : महिलेच्या कुटुंबियांची चौकशी सुरू
ATS
ATSSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील एका विवाहित महिलेचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यावरून तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरू असून दहशतवाद विरोधी पथक (एसीएस) संबंधित महिलेचाही शोध घेत आहेत. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी तरुणासोबत पळून गेली होती. ती त्याच्यासोबत सौदी अरेबिया व लिबियाला निघून गेली. आता ती ३ ऑगस्टला देशात परतलेली आहे. दरम्यान, तिचा काही आतंकवादी संघटनांसोबत संपर्क आल्याची माहिती मिळत आहे. यातूनच तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असण्याचाही ई-मेल पोलिसांना मिळाला आहे. यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून एटीएस तपास करत आहे. आता महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ATS
Telgi Fake Stamp Scam : राष्ट्रवादी फुटली अन् स्टॅम्प घोटाळ्याची पुन्हा राळ उठली; काय आहे 'तेलगी' प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, मूळ मालेगावची २४ वर्षीय महिलेचे सिडकोतील एका व्यावसायिकासोबत २०११ मध्ये लग्न झाले होते. ती २०२२ मध्ये वडिलांसोबत सौदीमध्ये गेली होती. तेथे तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली. देशात परत आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात राहिली. 'सोशल मीडिया'वरून ओळख वाढल्यानंतर तीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबत देश सोडला.

ATS
Girish Mahajan On Ajit Pawar : '' अजित पवार आमच्यासोबत आले आणि माझं...'' ; भाजप नेते गिरीश महाजनांचं पुण्यात मोठं विधान

याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. मात्र १८ ऑगस्टला पोलिसांना एक मेल आला, त्यात काही गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. डिसेंबरमध्ये ती गेल्यानंतर जानेवारी महिन्यात पतीला तिने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केल्याचा कॉल प्राप्त झाला. सूत्रांच्या मते पतीला काही फोटो सुद्धा मिळाले आहेत. यातूनच तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असण्याची संशय पोलिसांना असून त्या दिशेने एटीएसने तपास सुरू केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com