Lok Sabha Election 2024: 'यवतमाळ-वाशीम'मध्ये 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'; चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक...

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency: निवडणूक अधिकाऱ्यांना हातातलं काम सोडून पोतंभर चिल्लर मोजत बसावे लागले. अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र बसून तासभर चिल्लर मोजली. त्यानंतर अर्ज दाखल करून घेतला.
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency Sarkaknama

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात (Yavatmal-Washim Lok Sabha Constituency 2024) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या अपक्ष उमेदवारामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' (Gallit Gondhal Dillit Mujra) चित्रपटाची आठवण झाली.

मनोज गेडाम (Manoj Gedam) यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी अमानत रक्कम भरण्यासाठी चक्क पोत भरून चिल्लर आणली होती. ही रक्कम मोजताना निवडणूक अधिकाऱ्यांची नाकीनऊ आली. मनोज गेडाम यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक विभागात 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली. साडेबारा हजार रुपयांची चिल्लर मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक अधिकाऱ्यांना हातातलं काम सोडून पोतभर चिल्लर मोजत बसावे लागले. अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र बसून तासभर चिल्लर मोजली. त्यानंतर अर्ज दाखल करून घेतला. उमेदवाराने अशी रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी, असे गेडाम यांना या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency
Ahmednagar Lok Sabha 2024: जयंतरावांनी विखेंना डिवचले, नगर दक्षिणेत आता आयात उमेदवाराची गरज नाही...

सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या यवतमाळ येथील मनोज महादेव गेडाम हे लोक गुरुदेव या टोपण नावाने जिल्ह्यात ओळखले जातात. गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी चिल्लर रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळेच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. मी ही लोकसभा निवडणूक जिंकणारच, असा विश्वास त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला.

"गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा" चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे याने नामांकन अर्ज दाखल करताना अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणली होती. यानिमित्ताने पुन्हा या चित्रपटाची आठवण झाली. 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटात मकंरद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यासमोर ठेवली होती. त्यानंतर असे प्रकार अनेक निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com