Babanrao Lonikar On Thackeray : निष्क्रिय अन् भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून तुमची ओळख होती, म्हणून तोंड सांभाळून बोला..

Bjp : यापुढे तुम्ही अशा भाषेचा वापर केला तर राज्यातील १२ कोटी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही.
Bjp Mla Babanrao Lonikar News, Jalna
Bjp Mla Babanrao Lonikar News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Jalna : ठाण्यातील युवतीसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाकडून झालेल्या हल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा `फडतूस` असा केलेला उल्लेख भाजपच्या लोकप्रतिनिधींना रुचलेला नाही.

Bjp Mla Babanrao Lonikar News, Jalna
Narayan Rane on Uddhav Thackeray : कोरोना काळात लोक मरत होते; इकडे ठाकरे टेंडरमागे 15 टक्के घेत होते, राणेंचा थेट आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी उद्धव ठाकरे यांना बाहेर फिरू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर ठाकरे विरुद्ध भाजप (Bjp) असा संघर्ष सुरू झाला आहे. यातच माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी उडी घेतली आहे.

उद्धव ठाकरे तुमची भ्रष्ट आणि निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून नोंद झालेली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणून नका, अन्यथा राज्यातील १२ कोटी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा दम लोणीकर यांनी माध्यमांशी बोलतांना भरला. कोरोना काळात लोक मरत असतांना तुम्ही घरात बसून होतात, त्यामुळे तुमची घरकोंबडा अशी प्रतिमा महाराष्ट्रात झाली होती.

या काळातील भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्री म्हणून निष्क्रियतेचा ठपका तुमच्यावर आहे. त्यामुळे आमच्या नेत्याबद्दल, गृहमंत्र्यांवर बोलतांना जरा तोंड सांभाळून बोला. तुम्हाला अशी भाषा शोभत नाही, यापुढे तुम्ही अशा भाषेचा वापर केला तर राज्यातील १२ कोटी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, तुमचे तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा इशारा समजा, असेही लोणीकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com