Imtiaz Jalil : जिल्ह्यातील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचे तुम्ही सोपवलेले काम प्रामाणिकपणे करणार..

काही राजकीय नेते निवडून आल्यानंतर पाच वर्षे फक्त राजकारणच करतात. गेल्या तीन वर्षात तुम्ही हा फरक बघितला असेल. मी राजकारण कमी व विकास कामे जास्त करणारा खासदार आहे. (Imtiaz Jalil)
Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Aimim Mp Imtiaz jalil News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मी ऐकलं होतं की अच्छे दिन येणार आहेत. आता तर औरंगाबादमध्ये सहा मंत्री आहेत पैकी दोन केंद्रीय तर चार कॅबिनेट मंत्री असल्याने यापेक्षा अच्छे दिन अजून काय असू शकतात, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी लगावला.

एका शहराला सहा मंत्रीपदे मिळाली, पूर्ण महाराष्ट्रात असा कुठलाही जिल्हा नाही. (Aimim) परंतु हे काम करतात की नाही, यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीतरी पाहिजे आणि म्हणून तुम्ही ते काम माझ्याकडे दिले असल्याचेही इम्तियाज म्हणाले. (Marathwada)

गंगापूर तालुक्यातील गुरू धानोरा येथील सभेत बोलतांना इम्तियाज जलील यांनी सरकारच्या कामकाजावर टीका करतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अच्छे दिन घोषणेची खिल्ली देखील उडवली.

इम्तियाज जलील म्हणाले, सहा मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. आता फक्त आपल्याला एकच करायचे आहे की आपल्याला ही नेतेमंडळी ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी त्यांना आपण विचारले पाहिजे, की तुम्ही आपल्या भागासाठी काय करत आहात.

आज आपल्या भागातील शाळा, पाणी व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आहे. त्या समस्या आवाज उठवून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजही ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्राच्या इमारती उभ्या आहेत परंतु त्या ठिकाणी डॉक्टर नाही, औषध नाही, रस्ते नाहीत अशी परिस्थिती आहे.

Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Dhiraj Deshmukh : सरकार शेतकऱ्यांना 'गोगलगायी'च्या गतीनेच मदत देणार का ?

नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आजही आपल्या ग्रामीण क्षेत्रात अनेक शाळा अशा आहे, की त्या ठिकाणी व्यवस्थित वर्ग खोल्या नाहीत, भौतिक सुविधा नाही, मुलांना बसायला बाकडे नाहीत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागते.

काही राजकीय नेते निवडून आल्यानंतर पाच वर्षे फक्त राजकारणच करतात. गेल्या तीन वर्षात तुम्ही हा फरक बघितला असेल. मी राजकारण कमी व विकास कामे जास्त करणारा खासदार आहे. आज प्रजातंत्र असून जनतेने प्रत्येक वेळी कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक चांगल्या सुशिक्षित व्यक्तीला निवडून दिले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com