म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, विद्यार्थी संतप्त ; आव्हाडांनी माफी मागितली

''माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा,"
Jitendra Awhad
Jitendra Awhadsarkarnama

मुंबई : म्हाडाच्या परीक्षा आजपासून सुरु होणार होत्या. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. आव्हाडांनी विद्यार्थ्यांची क्षमा मागत ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत.

या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. 'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' असे आव्हाडांनी आल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आव्हाडांच्या टि्वटनंतर विद्यार्थी संतप्त झाले असून सोशल मीडियावर आव्हाड आणि महाविकास आघाडी सरकारला टीका होत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईकडून विविध पदांच्या (mhada exam 2021)भरती प्रक्रिया सुरु आहे. कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ जागा रिक्त आहेत.

”म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत” असे आव्हाड म्हणाले.

''या परीक्षेबाबत राज्यात अफवा पसरविल्या जात होत्या. ''गैरप्रकार करणाऱ्या कोणी पकडून दिले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पास झालेल्यांची दुसरी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आपण दिलेले पैसे वाया जातील,'' असे आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होतं. त्यांनी यााबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला होता.

Jitendra Awhad
मलिकांना सरकारचे पाहुणे बनावे लागणार ; सोमय्यांनी उडवली खिल्ली

नाशिक, आष्टी, अकोला येथे काही जण पैसे घेत असल्याची तक्रारी आल्या होत्या. ''फसवणुकीला बळी पडू नका. कुठलाही वशिला या परीक्षांमध्ये चालणार नाही. गृहनिर्माण विभाग असे प्रकार चालू देणार नाहीत. पारदर्शक पद्धतीनं ही पदे भरली जाणार आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं याचा फायदा घेऊन पैसे घेत असतील तर विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती त्यांच्या नादाला लागू नका, कारण वेळ आली तर ही परीक्षा मी रद्द करेल,'' असे आव्हाड म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com