Imtiaz Jaleel : 'आमची महाविकास आघाडीकडे अवास्तव मागणी नाही'

Imtiaz Jaleel reaction on the proposal given to Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीकडे पाठवलेल्या प्रस्तावावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.
Imtiaz Jaleel
Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभान निवडणूक महाविकास आघाडीबरोबर लढवण्याची 'एमआयएम'ची तीव्र इच्छा आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी 'एमआयएम' वेगवेगळ्या मार्गानं प्रयत्न करत आहेत.

'एमआयएच'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'एमआयएम'कडून पाठवलेल्या प्रस्तावावरून महाविकास आघाडीविरुद्ध फटकेबाजी केली.

'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे, असे सांगितले असले, तरी तो किती जागांबाबत आहे, हे सांगितले नाही. भाजपला (BJP) हरवायचे असेल, तर एकत्र आले पाहिजे, असे दोन महिन्यापूर्वी म्हटल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

Imtiaz Jaleel
Anil Deshmukh : 'महायुतीतून नाही तर अजितदादा स्वबळावर लढणार', शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने वर्तवला अंदाज

'शरद पवार यांचे खासगी स्वीय सहायक, नाना पटोले (Nana Patole), अमित देशमुख यांना 10 सप्टेंबरला महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवला आहे. महाविकास आघाडीने हो म्हटल्यास सोबत जागा लढवण्याची तयारी आहे. आमची यादी तयार आहे. परंतु पाच जागा पूर्वीच जाहीर केल्या आहेत. प्रस्ताव दिला असला, तरी त्यात कोणतीही तडजोड करायला तयार आहोत. आम्हाला राज्यात महायुती नको म्हणून तडजोड करू', असे इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे.

Imtiaz Jaleel
Prakash Shendge : आदिवासींचे आम्हाला काही नको; पण बारामतीसुद्धा राखीव होईल : धनगर नेत्याने मांडली भूमिका

इम्तियाज जलील म्हणाले, "मुस्लिम बहुल जागांवर तुम्हीही मुस्लिम उमेदवार देणार, त्यातून महाविकास आघाडी आणि आमच्या उमेदवारमध्ये मत विभागणी होईल. त्यातून महायुतीला फायदा होईल, आमच प्रस्ताव असला, तरी त्यात अवास्तव अशी मागणी नाही".

पवारसाहेबांना 'e-mail' पाठवलाय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही नवी सेक्युलर झालेली पार्टी आहे, त्यांच्या काही अडचणी आहे. त्यांचे अनेक मुद्दे आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही 'एनसीपी' आणि काँग्रेसकडे प्रस्ताव दिलाय. पवारसाहेब, काँग्रेसच्या नेत्यांना सांगतोय की, मी कबुतरमार्फत प्रस्ताव पाठवला नाही, मी आपल्या 'पीए'जवळ, आपल्या 'what's app'वर आणि 'e-mail'ने प्रस्ताव पाठवला आहे.

आमच्या प्रस्तावावर भूमिका स्पष्ट करावी. आमच्या पक्षातील इच्छुकांचे अर्ज आमच्याकडे आले असून, सुमारे दोन हजार अर्ज आलेत. यातून आमच्याकडे उत्सुक दिसतात. अजून मुंबई आणि पुण्यातील अर्ज मोजणे बाकी आहे. प्रस्तावात मी कोणताही आकडा सांगितला नसल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com