Rohit Pawar News: 'बैलाकडे पाहून कळतं प्रामाणिक कसं राहावं, लोक आपल्या काकांनाही विसरतात; रोहितदादांचा रोख कुणाकडे

Maharashtra Kesari bullock cart race:आपण संघर्ष करूयात
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Karjat: 'बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं, जो मालक बैलाला लहानाचं मोठा करतो, तो मालकाला कधी विसरत नाही. आपण आपल्या आई-वडिलांना कधी विसरत नाही, गुरूला कधी विसरत नाही, आपल्या काकांना कधी विसरत नाही. पण आज काल लोक ते विसरतात, पण जाऊ द्या, ज्यांना विसरायचं त्यांना विसरू द्या. आपण संघर्ष करूयात," असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Rohit Pawar
Dheeraj Deshmukh On Maratha Reservation: मधल्या भावाचा सल्ला थोरल्याआधी धाकट्या भावाने मनावर घेतला...!

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सुमारे 400 बैलगाडाधारकांनी सहभाग नोंदवला होता. मंगळवारी रात्री उशिरा बैलगाडा शर्यतीची अंतिम शर्यत झाली. या वेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

मोदींना बोलण्याचं धाडस नाही...

मराठा आरक्षणाबाबत रोहित पवार म्हणाले, "ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र, जे पण आरक्षण दिले आहे हे टिकलं पाहिजे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण दिले गेले असते. यासोबतच धनगर समाजाला, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजालादेखील आरक्षण दिले गेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येतात, मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नाही,"

मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी होतेय...

राज्यात मराठा लोकसंख्या 28 टक्के असताना सरकारने 10 टक्के आरक्षण कसे दिले, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर भाजप सरकारकडून 13 टक्के आरक्षण दिलं गेलं आणि आता दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे, म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी कमी करत आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

R

Ajit Pawar, Rohit Pawar
Vanchit-INDIA News : 'वंचित'कडून पुन्हा 'त्या' मुद्द्यांची आठवण, इंडिया सारखी गत महाविकास आघाडीची होऊ नये !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com