Raj Thackeray : मराठा आरक्षणावरून जरांगेसह कोणा कोणाला फटकारलं? राज ठाकरे म्हणाले, 'मागणी आहे ना, मग...'

MNS president Raj Thackeray criticizes political parties including Manoj Jarange over Maratha reservation : मराठा आरक्षणावरून संघर्षावरून मनोज जरांगे आणि त्यांना आरक्षणासाठी आश्वासन देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांवर राज ठाकरेंची टीका.
Raj Thackeray  4
Raj Thackeray 4Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्यासह त्यांना आश्वासन देणाऱ्या सगळ्याच पक्षांना फटकारले.

"आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहिती आहे, असे सांगून मनोज जरांगे उपोषणाला बसलेत. त्यांनाही जाऊन सांगितलं, मागणी आहे ना, मग ती कशी करायची ते सांगा, हा किचकट आणि तांत्रिक विषय आहे", असे म्हणत राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांनी फटकारले.

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) भूमिका मांडली. ही किचकट आणि तांत्रिक विषय आहे. देशाच्या घटनेशी जोडला आहे. एका महाराष्ट्र राज्याशी नाहीतर संपूर्ण देशातील राज्यातील इतर जात समूहाशी देखील हा विषय जोडला असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

Raj Thackeray  4
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांनी जरांगेंना हिनवले, कावळ्याच्या शापाने...

राज ठाकरे म्हणाले, "मराठवाड्यात गेलो होतो. तिथं मराठा आरक्षणा देण्याची मागणी केली. मी मराठा आरक्षणावर पूर्वीच भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात माझी धमक आहे. मी तुम्हाला जो शब्द देईल, तो पूर्ण करू शकतो. हातात सत्ता द्या, एकही तरुण, तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही. आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत, हे सर्वांना माहीत आहे". राज ठाकरे (Raj Thackeray) खर बोलण्याची धाडस करतो. त्यामुळे लोकांना तो परवड नसेल. जर ती गोष्ट होऊच शकत नाही. ती आपण का समजावून घेऊ शकत नाही, हेच मला कळत नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray  4
Raj Thackeray : 'उद्धव इतिहासातच गुंतलेत, CM शिंदे 'पुष्पा स्टाईल'मध्ये, तर पवारांवर जोरदार टीका'

'मुंबईत मराठा समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा आला होता. त्या मोर्चाचं स्वागतासाठी व्यासपीठावर राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, सर्व राजकीय पक्षाचे लोक गेले होते. सगळ्यांनी सांगितलं, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मग आडवलं कोणी? थांबवलंय कोणी? तोंडाला पानं पुसायची. आरक्षण होऊच शकत नाही. घटनेत बदल करावा लागले. हा मराठा समाजाचा विषय नाही. प्रत्येक राज्यातील समाजाचा विषय आहे. एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाही. एक जर विषय काढला, तर राज्यातील इतर जातींचे लोकं डोकं वर काढतील, प्रत्येकाला नाकीनऊ येतील. त्यामुळे कुणीही मागणी पूर्ण करू शकत नाही, हे धान्यात घ्या', असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

जरांगेंची मागणी आहे, तर...

'कोणताही समाज, जात हाताला कामाशिवाय राहू नये, ही माझी भावना आहे. पण सर्व राजकीय पक्ष भूलथापा मारत आहे. मतांसाठी खोटं सांगितलं जात आहे. उद्या निवडणुका झाल्यानंतर, हा विषय बाजूला पडेल, निघणार नाही. पुन्हा निवडणुका आल्या हे वारे पुन्हा जोरात सुरू होईल. सतत वीस वर्षापासून हाच विषय चालू आहे. महाराष्ट्राभर शिस्तमध्ये मराठा समाजाचे लाखा-लाखांचे मोर्चा काढले होतो. काय झालं मोर्चांनंतर, काहीही झालं नाही. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघाले होते. काय झालं? आज त्यातीलच एका गरीब वर्गाला घेऊन मनोज जरांगे उपोषणाला बसलेत. त्यांनाही जाऊन सांगितलं, मागणी आहे ना, मग ती कशी करायची ती सांगा, हा किचकट आणि तांत्रिक विषय आहे. त्यातून आता मार्ग काढता येणार नाही. आणि हा विषय शरद पवारांपासून ते सर्वांना माहीत आहे', असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे 'पाॅवर'च नाही

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले, अरे देऊ शकत नाही, बाबा!, अशा शब्दात फटकारत यांच्या हातात ती पाॅवरच नाही, राज्य सरकार ही गोष्ट करूच शकत नाही, असे म्हणत तामिळनाडू सरकारने केलेला विषय सर्वोच्च न्यायालयात रेंगाळल्याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधले. यापेक्षा महाराष्ट्रात उद्योगधंदे कसे जास्त येतील, नोकऱ्या कशा वाढतील, त्यासाठी प्रयत्न करा', असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com