Raj Thackeray : 'महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातय अन् आपण आपट्याची पानं वाटतोय'

MNS President Raj Thackeray podcast on Dussehra : मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभेच्छा देत, महाराष्ट्राच्या जनतेला विधानसभा निवडणुकीसाठी नेमकं काय आवाहन केलं?
Raj Thackeray 1
Raj Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

"दसऱ्याच्या शुभेच्या देताच, आता बेसाधव राहून महाराष्ट्र घडणार नाही, असे सांगत महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आपण आपट्याची पानं वाटतोय. आता शमी झाडावरची शस्त्र उतरवण्याची वेळ आली आहे", असे राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी पाच मिनिटांच्या पॉडकास्टमध्ये चौफेर टोलेबाजी करताना हा दसरा विधानसभा निवडणुकीच्या (Election) तोंडावर होत असून, खूप महत्त्वाच आहे, याकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधले. जातीपातीच्या राजकारण गुंतून ठेवून महाराष्ट्राला ओरबडणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी आहे. मतांची प्रतारणा करणाऱ्यांना जाब विचारण्याची संधी आहे, असे सांगून झाडावर ठेवलेली शस्त्र उतरण्याची हीच योग्य वेळ आहे, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं.

Raj Thackeray 1
Sayaji shinde join NCP : राष्ट्रवादीत प्रवेश करताच सयाजी शिंदेंकडे मोठी जबाबदारी! अजितदादांची घोषणा

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, "साडेतीन मुहुर्तापैकी एक, या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. दसरा म्हटलं की, सोनं लुटणं आलं, असे आपण म्हणतो. दरवर्षी आपण तेच करत आलो. पण महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे. आणि आम्ही फक्त आपट्याचं पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याचं पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सर्व सोनं लुटून चाललं आहे. पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात, तर कधी जातीपातीत मशगुल! आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी?"

Raj Thackeray 1
12th October in History : पाकिस्तानातली उलथापालथ, सुपरस्टार गजाआड!; इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

रस्ते, उड्डाणपुलं म्हणजे प्रगती नव्हे

'आजचा दसरा खूप महत्त्वाचा आहे, आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळी बेसावध राहून चालणार नाही, असे सांगून दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि हे सर्व राजकीय पक्ष आपपाले खेळ करत राहतात. यामध्ये महाराष्ट्राची प्रगती कुठं चालली आहे, ते सांगा? नुसते रस्ते बांधण, उड्डाणपुलं बाधणं ही प्रगती नसते. म्हणजे, आमच्या हातात मोबाईल फोन आले, कलर टीव्ही आला, या गोष्टी तुमची गॅझेट्स म्हणजे, प्रगती नव्हे. प्रगती विचारानं अन् समाजानं व्हावी लागते. जेव्हा आपण परदेशात जातो, देश पाहतो, तेव्हा त्याला प्रगत देश म्हणतात. अजून आपण चाचपटत आहोत. इतक्या वर्षांत प्रगतीच्या थापा मारून, तुमच्यातील राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच माणसांना निवडून देता आणि काही नाही पश्चाताचा हात कपाळावर मारून घ्यायचा. नंतर पाच वर्षे बोंब मारायची, हे आता नको आहे', असे राज ठाकरेंनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी संधी द्या

राज ठाकरे म्हणाले, "आपण म्हणतो, पांडवांनी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती. पण तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर नेऊन ठेवता. तुमच्या हातात मतदानचा शस्त्रं आहे. हे शस्त्र मतदानावेळी न वापरता, या लोकांना शिक्षा न करता, तुम्ही नुसतं शस्त्र वरती ठेवून देता, निवडून संपल्या की, शस्त्र बाहेर काढता, आणि नुसतं बोलत बसता. मग मतदानाच्या दिवशी काय होतं? हा माझ्या जातीचा, हा माझ्या जवळचा, हा ओळखीचा, असं करून राष्ट्र नाही उभं राहत, राज्य नाही उभं राहत. आज तुम्हाला संधी आली आहे, हात जोडून विनंती आहे, सर्वांना संधी दिलीत तुम्ही, तशी संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना द्या. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवतो".

शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा

'या निवडणुकीत क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही मतदानात ज्या लोकांना जोपासलंत, संभाळत, ते तुमच्या मतांची प्रतारणा करत आले आहेत. तुम्हाला अत्यंत गृहीत धरलं गेले. हेच महाराष्ट्राचं नुकसान करत आलं आहेत. माझ्या महाराष्ट्रातील तरुणांना, तरुणींना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना विनंती आहे की, दसऱ्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत बेसावध राहू नका. त्या शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, ही क्रांतीची वेळ आहे, ही वचपा घेण्याची वेळ आहे. आताच ती शस्त्र उतरवून या सगळ्यांचा वेध तुम्हाला घ्यावा लागेल', असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

युती, आघाड्या करून मतांची प्रतारणा केली

'गेली पाच वर्षे, खास करून गेली पाच वर्षे, ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं, वेड्यावाकड्या युती, आघाड्या करत बसले, आज बोलतील सर्वजण, सायंकाळच्या मेळाव्यांमध्ये, यात तुम्ही कुठे असणार आहात? तुम्ही नसणारच आहात. महाराष्ट्र नसणार आहे. मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय, गेली अनेक वर्षे पाहतोय, ती संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू देत, जगात हवा वाटावा, असा महाराष्ट्र घडावा, हेच माझं स्वप्न आहे. आताच त्या शमीच्या झाडांवर सगळी शस्त्र उतरावा. ज्या मतदान असेल, त्या दिवशी या सर्वांचा वेध घ्या, एवढं दसऱ्याच्या दिवशी सांगतो', असेही राज ठाकरे यांनी म्हंटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com