Monsoon Session : सत्ताधाऱ्यांना प्रश्नांची भीती, पत्रकार परिषदेविनाच अधिवेशन गुंडाळलं! विरोधकांचा गंभीर आरोप, प्रथेला तडा!

Monsoon Session Legislative Tradition : शनिवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र, अधिवेशनानंतर सत्ताधारी पत्रकार परिषद घेत असतात विधीमंडळातील ही अलिखित परंपराच आहे.मात्र, यंदा पत्रकार परिषद न झाल्याने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहे.
Opposition leaders criticize the ruling alliance after the Maharashtra Monsoon Session concluded without the customary press conference, alleging a break from legislative tradition.
Opposition leaders criticize the ruling alliance after the Maharashtra Monsoon Session concluded without the customary press conference, alleging a break from legislative tradition.sarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session News : महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले. या अधिवेशनात १५७ तास कामकाज झाले.या अधिवेशनामध्ये अनेक विधेयके आली आणि त्यावरती चर्चाही झाली. काही विधेयकं घाईघाईमध्ये मंजूर देखील झाली.

अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाकडून पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली जातात. मात्र, ही परंपरा यंदा खंडित झाली.ही पत्रकार परिषद म्हणजे विधीमंडळातील अलिखीत प्रथा आहे. मात्र, या प्रथेला सत्ताधाऱ्यांनी यंदा तडा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

ज्या पद्धतीने अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती चहापानाचा कार्यक्रम असतो, विरोधकांसोबत चर्चेचा कार्यक्रम असतो, त्यानंतर पत्रकार परिषद असते. विधिमंडळामध्ये, अधिवेशनामध्ये कुठले कुठले मुद्दे, कुठली कुठली विधेयके येणार आहेत, कशा पद्धतीने सरकारची धोरणे असणार आहेत, या सगळ्यावरती चर्चा होते. त्याच पद्धतीने अधिवेशन संपल्यानंतर देखील पत्रकार परिषद होते.

सत्ताधारी पत्रकार परिषद घेतात, विरोधक पत्रकार परिषद घेतात, त्यातून आरोप-प्रत्यारोप होत असतात. या अधिवेशनामध्ये कुठली विधेयके मंजूर झाली, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, सरकारची धोरणे काय आहेत, रोडमॅप कशा पद्धतीने असणार आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, या सगळ्या गोष्टींवर या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार टोकदार प्रश्न प्रश्न विचारतात, त्या सगळ्याची उत्तरे सरकारकडून दिली जातात. मात्र, यंदा सरकारने पत्रकार परिषदेच घेतली नाही.

सरकारने पळ काढला...

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषदच झाली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप करत सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे, असे म्हटले आहे.पत्रकार परिषद न घेता परंपरा यंदा सत्ताधाऱ्यांनी खंडित केली आहे, असे देखील सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com