पुणे : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता महाराष्ट्रातही एंट्री झाल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. अशावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 2022 अंदाजित वेळपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये ही परीक्षा कशी होईल, याकडे लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. हे वेळापत्रक अंदाजित आहे, त्यामुळे परीक्षेच्या नेमक्या तारखेत काही बदल देखील होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी २०२२ या वर्षामध्ये होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्षा याचसोबत महाराष्ट्र तांत्रिकसेवा पूर्व परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व न्याय दंडाधिकारी परीक्षा २०२२ मध्ये दोन वेळा होणार आहेत. विभागीय पीएसआय आणि सहायक मोटार वाहक निरीक्षक या परीक्षा एक वेळा होणार आहेत.
लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोशल मीडियावर देखील वेळापत्रक शेअर केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७ ते ९ मे २०२२ रोजी होईल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर आहे.
राज्यसेवा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२
मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२
मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२
पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२
मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१
पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२
मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२
राज्यसेवा परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १९ जून २०२२
मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२
मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३
महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर
मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२
पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२
मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३
या लिंकवर वेळापत्रक डाउनलोड करा : https://bit.ly/3G4BdDs
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.