Nagpur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल करत कर्नाटकच्या स्वामींचा नागपुरात अजब दावा !

Nitin Gadkari : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे भाजप चे अधिकृत उमेदवार आहे. त्यांचा प्रचार सुरु झाला आहे. पण, 20 मार्च रोजी कर्नाटकातील एका स्वामींनी नागपुर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आले आहे.
Nitin Gadkari, Venkateshwara Maha Swamij
Nitin Gadkari, Venkateshwara Maha Swamij Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : देशात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 21 राज्यात पहिल्या टप्प्यात 103 लोकसभा मतदार संघात निवडणुक होईल. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपुर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर आणि चंद्रपुर येथे निवडणुक होत आहे. 20 मार्च रोजी नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. 27 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज या मतदार संघात दाखल करता येतील. 19 एप्रिल रोजी या पाच ही मतदार संघात निवडणुक असेल.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात पाच मतदार संघात निवडणुका होत आहे. राज्यातील या मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात दहा अर्ज आता पर्यंत दाखल झाले आहे. यात नागपूर येथुन 5 उमेदवारांनी तर भंडारा गोंदिया 2 , गिडचिरोली - चिमुर 2 , रामटेक या मतदार संघातुन एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. चंद्रपुर या लोकसभा मतदार संघातुन अद्याप कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

काँग्रेस ने नागपुर येथे विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. ते विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक आहे. नगरसेवक ते आमदार असा विकास ठाकरे यांचा प्रवास राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत विलास मुत्तेमवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. आता ते यंदा स्वतःच लोकसभा निवडणुकीत उमेदवार असून 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari, Venkateshwara Maha Swamij
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा धक्का; महादेव जानकरांचा ‘यू टर्न’, महायुतीसोबत राहण्याचा निर्णय

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. नितीन गडकरी येत्या 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी नागपूरात भाजप ने 'कहो दिल से नितीन जी फिरसे' असा सुरु केला आहे. मतदार संघातील प्रत्येक मतदाराची भेट घेण्यासाठी गडकरी सकाळ पासूनच प्रचारात व्यस्त आहेत. काँग्रेस नेते, दिवंगत श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना यांची भेट गडकरींनी घेतली. श्रीकांत जिचकार हे गडकरींचे जीवलग मित्र होते. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, नागपुरातील प्रसिध्द व्यवसायीक बसंतलाल शाॅ, पद्मश्री डाॅ.चंद्रशेखर मेश्राम, नागपुरचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचे वंशज राजे वीरेंद्र शाह, व्यवसायी प्रभाकर मुंडले, श्रीमंत राजे संग्राम सिंह, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, व्यावसायिक कमलेश समर्थ, राजेश लोया, माजी न्यायमूर्ती विकास शिरपुरकर, ज्येष्ठ वकील व्ही.आर.मनोहर, ज्येष्ठ संपादक लक्ष्मणराव जोशी, काँग्रेस च्या माजी महापौर कुंदाताई विजयकर या सर्वांच्या घरी नितीन गडकरी यांनी भेट देत त्यांचे आशिर्वाद घेतले. यांच्यासह मतदार संघातील अनेक ज्येष्ठांच्या भेटीगाठी नितीन गडकरी यांनी घेतल्या. इतकेच नाही तर त्यांनी विविध छोट्या सभांना देखील संबोधित करत प्रचार सुरु केला आहे.

राज्यात नागपूर येथून भाजप ने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना तिकिट घोषित केले. पण, येथे कर्नाटक च्या एका स्वामींनी थेट भाजप चे उमेदवार म्हणुन अर्ज दाखल केला आहे. कर्नाटकातील हे स्वामी महाराष्ट्रात अचानक कसे आले, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांनी भाजप च्या नावाने अर्ज कसा दाखल केला अशी विचारणा होत आहे. नियमानुसार स्वामींना जो पर्यंत पक्षाचा एबी फाॅर्म मिळणार नाही तो पर्यंत ते भाजप चे अधिकृत उमेदवार ठरणार नाही. पण, स्वामींनी अचानक भाजप पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांचे डोळे चकाकले आहे. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी असे या उमेदवाराचे नाव आहे. 36 वर्षीय व्यंकटेश्वरा महा स्वामीजी कर्नाटकातील बारडोल येथील रहिवासी आहे. त्यांनी 20 मार्च रोजी हा अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी नागपुर मतदार संघ कसा काय निवडला हे कोडेच आहे.

Nitin Gadkari, Venkateshwara Maha Swamij
Satara Lok Sabha Election: उदयनराजेंना ताटकळत ठेवणं, हा सातारच्या गादीचा अपमान; सुळेंचा भाजपवर घणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com