Mumbai, 24 March : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये जानकर यांना लोकसभेची एक जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी आज ‘यू टर्न’ घेत आपण महायुतीसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. जानकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक झाली. त्या बैठकीत जानकर यांच्या पक्षाला महायुतीमध्ये (Mahayuti) लोकसभेची एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा कोणती असेल याची लवकरच घोषणा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदी यांच्यासोबत आहोत, असेही महायुतीच्या नेत्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महादेव जानकर यांनी म्हटले आहे. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी सोबत राहू, असेही जानकर यांनी स्पष्ट केले आहे. याच बैठकीत जानकर यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचाही निर्णय झाला आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांचा हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी धक्कादायक ठरला आहे. कारण, पवारांनी माढ्याची जागा महादेव जानकर यांना देऊ केली हेाती. तसेच, जानकर यांनीही माढ्यातून आपण महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. माढ्यातून जानकर यांच्या रूपाने शरद पवार यांना तगडा उमेदवार मिळाला होता. मात्र, महाविकास आघाडीसोबत युतीची घोषणा होण्याच्या आधीच महादेव जानकर यांनी यू टर्न घेतला आहे.
माढ्यात जानकर यांना तिकिट देऊन बारामती मतदारसंघ सेफ करण्याचा पवारांचा डाव महायुतीने उधळून लावल्याचे आजच्या घडामोडीवरून दिसून येते. आता पवारांना माढ्यासाठी तेवढ्याच ताकदीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. तसेच, बारामती आणि माढ्यातील सामाजिक समीकरणांचाही विचार करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.