Nana Patole Vs BJP : 'सत्तेत राहण्यासाठी ते दाऊदला देखील बरोबर घेतील'; नाना पटोलेंनी भाजपला लगावला टोला!

Nawab Malik attended Ajit Pawar NCP meeting : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आयोजित केलेल्या बैठकीला भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले आमदार नवाब मलिक उपस्थित होते.
Nana Patole
Nana Patolesarkarama
Published on
Updated on

Nana Patole criticized BJP over Nawab Malik :"भाजप सत्तेसाठी लाचार आहे. सत्तेत राहण्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. आतंकवादी दाऊद देखील त्यांच्याबरोबर आला, तरी त्यांना सत्तेसाठी तो चालेल", असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. तसेच 'भाजपकडे कुठलाही सुसंस्कृतपणा आणि देशप्रेम नाही. भाजप फक्त सत्तेसाठी जगते.', असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाची विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा बैठकीला मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे सर्व आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र या बैठकीला नवाब मलिक यांनी देखील हजेरी लावल्याने यावरून नवाब मलिक अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nana Patole
Nawab Malik News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची 'देवगिरी' खलबतं; बैठकीला नवाब मलिकांचीही हजेरी

परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांनी आयोजित केलेल्या आमदारांच्या बैठकीला नबाब मलिक यांच्या हजेरी लावण्यावरून महाविकास आघाडीने महायुतीची कोंडी करण्यास सुरुवात केली. विशेष करून महाविकास आघाडीने भाजपला(BJP) यात सर्वाधिक टार्गेट केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला. "सत्तेसाठी यांच्यासोबत आतंकवादी दाऊद आला तरी ते घेतील", असा निशाणा नाना पटोले यांनी साधला. भाजपकडे सुसंस्कृतपणा आणि देशपणा हा दाखवण्यासाठी आहे. त्यांचे देश प्रेम हे फक्त सत्तेसाठी आहे. भाजपने सत्तेसाठीच त्यांच्यावर आरोप लावला होता. आताच त्याच लोकांना सत्तेसाठी जवळ घेत आहेत. यामुळे भाजपच्या सुसंस्कृतपणावर काय बोलावे? असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

Nana Patole
Bacchu Kadu : नवाब मलिक यांच्यामुळे अजितदादांची फसगत, मजा येणार आहे; बच्चू कडू असे का म्हणाले....

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांचे उमेदवारी अर्ज आहेत. यात महाविकास आघाडी मधील काँग्रेसची मतं निर्णय भूमिका बजावणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी नाना पटोले हे आहेत. यात त्यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अर्ज भरला आहे. प्रज्ञा सातव अर्ज भरताना त्यांच्या दोन्ही मुलांसह विधिमंडळ इमारतीत उपस्थित होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com