Nana Patole : फडणवीसांसह पोलिस महासंचालकांवर नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole Big Demand Over the Deteriorating Law and Order in the State: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून निशाणा साधला.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील कायदा व सुव्यवस्था एवढी बिघडली आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी मुंबई इथं पत्रकार परिषद घेऊन राज्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या घालून, कोयत्याने वार करून हत्या झाली. बदलापूर घटनेतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेतील जयदीप आपटे अजून पसार आहे, महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. ड्रग्ज आणि गुन्हेगारी फोफावत आहे, अशा अनेक मुद्यांवर देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला.

Nana Patole
Pankaja Munde News : 'महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का?' ; पंकजा मुंडेंनी दिलं खास उत्तर, म्हणाल्या...

शिवरायांचा पुतळ्या कोसळण्याच्या घटनेतील शिल्पकार जयदीप आपटे अजून अटक का झाली नाही? तो पाकिस्तानला पळून गेला की काय? असा सवाल करत, बदलापूर घटनेतील आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घ्यावा. तसेच पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबित करण्याची देखील मागणी नाना पटोले यांनी केली.

Nana Patole
Sujay Vikhe Vs Vivek Kolhe : 'कोणीही आलं, तर त्याचं स्वागत'; सुजयदादाचं विवेकभैय्यांना आव्हान

जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस

सिंधुदुर्ग इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस त्याच्या मागावर आहे. पण तो पोलिसांना गुंगारा देत आहे. तो पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी ही नोटीस काढली आहे. जयदीप आपटे याच्या शोधासाठी सात पथके कार्यरत आहेत. या घटनेत दाखल गुन्ह्यात बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला अटक केली असून, त्याला 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com