Pune BJP News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रमुख नेते मंडळींना काही मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत आणि या नेतेमंडळींकडून त्या मतदार संघामध्ये जाऊन आढावा बैठका देखील घेण्यात येत आहेत.
भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड, वडगाव शेरी, खडकवासला, दौंड, शिवाजीनगर आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पुढील तीन दिवस पंकजा मुंडे पुणे मुक्कामी राहून या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आज त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यमांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून विचारला गेला असता पंकजा मुंडे यांनी 'आता तुम्ही बातमी काढण्याचा प्रयत्न करताय.' ,असं म्हणत या प्रश्नाला बगल देत अधिक बोलणं टाळलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजपच्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हा भाजपच्या संघटनेचा दौरा आहे. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 100 ते 150 पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. याकडे आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून देखील पाहता येईल.
चिंचवड विधानसभेत इच्छुकांची गर्दी, कसा मार्ग काढणार? असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, फक्त चिंचवडच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारचे इच्छुक होते. मात्र प्रत्येकवेळी भाजप(BJP) मार्ग काढतोच, आम्हाला इच्छुकांची यादीतून एकाचं नाव द्यावं लागतं. याची प्रॅक्टिस कोअर कमिटीला आहे, ते यातून तोडगा काढतील असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरती बोलताना मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या क्षणी अत्यंत नम्रपणे माफी मागितली आहे. महाराजांवरील खरं प्रेम त्यातून व्यक्त केलं. काही घटना अशा घडतात, त्यावरून राजकारण करू नये. मात्र मोदींजींनी माफी मागून आदर्श दाखवून दिला, यातून विरोधकांनी प्रेरणा घ्यावी.
या वक्तव्यानंतरचं मोदींजींनी(Narendra Modi) हे वक्तव्य केलंय. यानंतर कोणी काही वक्तव्य करण्याचं कारण नाही. कोणी काहीही बोललं, त्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही. मग कोणत्याही राजकीय नेत्याच्या आरोपावर बोलणार नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.