काँग्रेसच्या ५४ पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या जाणार; राजीनामा देण्याचे नाना पटोलेंचे आदेश

Congress | Nana Patole : एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी : उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्रातील तब्बल ५४ पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत. 'एक व्यक्ती, एक पद' ही संकल्पना राबण्यासाठी हे आदेश दिले असल्याची माहितीही पटोले यांनी दिली. ते महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) शिर्डीमधील दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेत बोलत होते. (Nana Patole | Congress Latest News)

यावेळी बोलताना पटोले म्हणाले, २ पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी नसीम खान, शरद आहेर आणि देवानंद पवार यांनी यापूर्वी राजीनामे सादर केले असल्याची माहितीही पटोले यांनी दिली. (Nana Patole | Congress Latest News)

नाना पटोले पुढे म्हणाले की, देशामध्ये सध्या हुकुमशाही राजवट सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारने देश विकायला काढला असून सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जातीयतेची तेढ निर्माण करून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणले आहे. परंतु लोकशाही व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष प्रभावी काम करत असून दिल्ली संकटात आली त्यावेळेस महाराष्ट्र मदतीला धावून गेला हा इतिहास आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून होणाऱ्या नवसंकल्प कार्यशाळेतून देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी नियोजन केले जाणार आहे. आगामी काळात जिल्हानिहाय एक दिवसीय चिंतन शिबिर होणार असून प्रत्येक जिल्ह्यातून ७५ किलोमीटरची पदयात्रा काढली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील सर्व योजनांची अंमलबजावणी सह्याद्रीच्या कुशीत, साईबाबांच्या पवित्र भूमीत असल्या शिर्डी शिबिरातून होत आहे, असेही पटोले म्हणाले. (Nana Patole | Congress Latest News)

या कार्यशाळेत राजकीय, सामाजिक, कृषी, ग्रामीण असे सहा विभाग करण्यात आले असून या सर्व क्षेत्रातील धोरणांवर काँग्रेसचे प्रभारी एच.के .पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा होत असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com