Nana Patole : नाना पटोलेंनी कट्टर विरोधकाची घेतली गळाभेट; नेमक काय घडलं ?

Political News : भंडारा-गोंदियातील एका कार्यक्रमप्रसंगी रविवारी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निमित्ताने एकमेकांची गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या गळाभेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : राज्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका चुरशीने पार पडल्या. यावेळी महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहवयास मिळाली. अनेक सभांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. मात्र, भंडारा-गोंदियातील एका कार्यक्रमप्रसंगी रविवारी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निमित्ताने एकमेकांची गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या गळाभेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नाना पटोले (Nana Patole) आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राजकीय व्यासपीठावरून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनी रविवारी एकमेकांची गळाभेट घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Nana Patole
BJP News : भाजपच्या पायगुणामुळेच आमदार नव्हे तर मंत्री झालात; अजितदादांच्या मंत्र्यांच्या विधानाला प्रत्युत्तर

भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी घेतलेली गळाभेट काही वेगळे राजकीय संकेत तर, देत नाही ना, अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र आणि त्या अंतर्गत येत असलेल्या सातही विधानसभा मतदारसंघांवर आपलेच वर्चस्व राहावे, याकरिता प्रफुल पटेल (Prafull Patel) आणि नाना पटोले यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Nana Patole
Ncp Politics : बडा नेता शरद पवारांची सोडणार साथ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा रंगली होती. नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला होता. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. नाना पटोले हे स्वयंभू घोषित मुख्यमंत्री आहेत. अशा म्हणण्याने कुणी काही बनत नाही. महाराष्ट्रामध्ये तुमचे सरकार आले पाहिजे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते.

Nana Patole
Ratnagiri Congress : रत्नागिरीत ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसनेही कूस बदलली? लवकरच मिळणार जिल्हाध्यक्ष

विधानसभेच्या अनेक सभांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्यावर विधानसभा निवडणुकीत मात केल्याचे पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सातपैकी सहा जागा जिंकून पटेल यांनी वर्चस्व गाजवले. यात त्यांना भाजपची मोलाची साथ मिळाली होती. रविवारी या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या गळाभेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Nana Patole
Mahayuti News : 'स्थानिक'च्या निवडणुकीवरून धुसफूस; अशोक चव्हाणांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीत रणकंदन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com