Nana Patole : रश्मी शुक्लांवर भरवसा नाय; नाना पटोले म्हणतात, 'तात्काळ हकालपट्टी करा'

Nana patoles demand the dismissal of Director General of Police Rashmi Shukla : राज्यातील विधानसभा निवडणुका कधीही लागू होतील, त्यापार्श्वभूमीवर वादग्रस्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याबाबत नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील पोलिस प्रशासनाच्या प्रमुख पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांविरोधात आक्रमक झालेत.

'रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता, आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका विष्पक्ष वातावरणात होण्यासाठी त्यांची तात्काळ हकालपट्टी करा', अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकांची राज्यात कधीही घोषणा होऊ शकते. महाविकास आघाडी, महायुती, महाशक्ती या आघाड्यांसह स्वतंत्रपणे निवडणुका लढणाऱ्या पक्षांनी देखील तयारीत आहेत. केंद्रीय निवडणूक (Election) आयोगाचे पथक देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक 28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे राज्यात चित्र दिसत आहे.

Nana Patole
Vidarbha Political News : होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीसाठी महादुला येथे उभारणार महाविद्यालय

निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशी महाविकास आघाडीमधील काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंगच बांधलाय. यामुळे निवडणुकांमध्ये कोणत्याही पातळीवर रिस्क घेण्यास तयार नाहीत. यातून त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवरून निवडणूक आयोगाकडे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Nana Patole
Sanjay Raut Politics: भाजप २०२४ नंतर अजित पवारांचा काटा काढणार, नंतर मुख्यमंत्र्यांचा नंबर!

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करताना म्हटले आहे की, "रश्मी शुक्ला यांना तात्काळ पदावरून हटवा. रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निष्पक्ष वातावरण होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी".

रश्मी शुक्लांवर कोणते आरोप आहेत

रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांना राज्य सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली. त्या जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत. रश्मी शुक्ला 'फोन टॅपिंग' प्रकरणात चर्चेत आल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. पण पुढे न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली. फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षातील नेत्यांचा फोन बेकायदेशीररित्या टॅप करण्याचा आरोप केला होता. त्यावेळी रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. यानंतर जानेवारी 2024 मध्ये रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने राज्याच्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकपदी नियुक्ती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com