पवारांप्रमाणे मुख्यमंत्र्यांना का भेटत नाही? : नानांनी केला उलगडा

`सरकारनामा`ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये नाना पटोले (Nana Patole) बोलत होते. ही मुलाखत पाहा सरकानामामा फेसबुक आणि `यू ट्यूब`वर
Pawar-Patole
Pawar-Patole sarkarnama

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एक चित्र आपल्याला सातत्याने दिसून येते ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची होणारी भेट. असे म्हंटले जाते की सरकारला निर्णय घेण्यासाठी किंवा धोरण ठरवण्यासाठी ही भेट असते. सोबतच सरकारचे कोणतेही संकट दूर करण्यासाठी ही भेट असते. सचिन वाझे-मनसुख हिरेण प्रकरण, संजय राठोड यांचा राजीनामा अशा अनेक घडामोडींवेळी या भेटी झाल्याचे पहायला मिळाले होते. मात्र काँग्रेसकडून अशा भेटी घेण्यासाठी आघाडीवर अपवादात्मक स्थितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांकडे जात असतात. त्यांना याबाबत विचारले असता, आमच्या दोन नेत्यांवर विश्वास, शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्यांना का भेटतात माहित नाही असे उत्तर त्यांनी दिले.

Pawar-Patole
पुणे-पिंपरीत अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालणार का ?

`सरकारनामा`ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये नाना पटोले बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सातत्याने भेटत असल्याचे दिसून येतात. तुम्ही अशी वारंवार भेट कधी घेत नाही, कि फोनवरुन सगळी काम करता? असा सवाल नाना पटोले यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की वरचेवर आमच्या भेटी होत असतात, पण किमान समान कार्यक्रमामधून हे सरकार चालत आहे. सोबतच या महाविकास आघाडीमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षाकडून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. आता आम्ही दोन दिलेत, या दोघांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते मंत्रीमंडळामध्ये देखील आहेत. पण शरद पवार वारंवार मुख्यमंत्र्यांना का भेटात, या भेटीत काय चर्चा होतात, हे आपल्याला माहित नाही.

Nana Patole
Nana Patolesarkarnama

संघटनात्मक कामांमुळे मला वेळ नाही.

मुख्यमंत्र्यांसोबत आपणही संवाद वाढवायला हवा या मताचा मी आहे, मात्र काँग्रेस पक्षातील संघटनात्मक कामांमुळे मला वेळ मिळत नाही. रोज सकाळी सुरुवात झाली की रात्री १ ते २ वाजेपर्यंत काम सुरु असते. पण आमचे दोन वरिष्ठ नेते समन्वय समितीमध्ये आहेत. त्यांच्याकडून लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम सुरु आहे. त्यांच्याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Pawar-Patole
संजय राऊत म्हणाले, शरद पवार हिमालय तर, चंद्रकांत पाटील टेंगूळ!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com