नाना पटोलेंच्या या खुलाश्यानंतर नितीन राऊत खूष होणार!

`सरकारनामा`ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे.
congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News Mumbai
congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News MumbaiSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मागच्या काही काळात नाना पटोले (Nana Patole) मंत्रीमंडळात जाणार की नाही? त्यांना उर्जा खात हवं आहे, त्यांना एखादे महत्वाचे आणि लोकाभिमुख खात हवं आहे, अशी चर्चा रंगली होती. पण आता या सगळ्या चर्चांवर नाना पटोले यांनी पूर्णविराम दिला आहे. `सरकारनामा`ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये बोलताना नाना पटोले यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसेच त्यांच्या याच खुलाश्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin raut) देखील खूष होणार आहेत, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

नाना पटोले म्हणाले, मंत्रीमंडळात जाता आले नाही हे मी माझे नशीब समजतो. कारण माझा स्वभाव असा आहे की आपण ज्या खुर्चीवर बसतो त्या पदाला १०० टक्के न्याय दिला गेला पाहिजे. त्या खात्याचा प्रमुख होणे म्हणजे त्या खात्याला आणि पर्यायाने राज्यातील जनतेला न्याय देणे असते आणि सध्या काँग्रेस पक्षातील संघटनात्मक कामांमुळे मला वेळ मिळत नाही. रोज सकाळी सुरुवात झाली की रात्री १ ते २ वाजेपर्यंत काम सुरु असते. कोणाचे पक्ष प्रवेश, कोणाच्या बैठका, निवडणूकांचे नियोजन अश्या सगळ्या गोष्टी असतात, असेही नाना पटोले म्हणाले.

congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News Mumbai
बुलेट ट्रेन म्हणजे आमच्या मुंबईला लुटून नेण्याचा डाव : नाना पटोले

मात्र नाना पटोलेंच्या खुलाश्यानंतर आता उर्जामंत्री नितीन राऊत खुश होण्याची शक्यता आहे. कारण मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्याकडील उर्जा खात नाना पटोले यांना, तर नितीन राऊत यांना विधानसभेचे अध्यक्षपद देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तश्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र आता या सगळ्यावर खुद्द पटोले यांनीच खुलासा केल्याने नाना पटोले मंत्रीमंडळात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. असे इतिहासातील वादग्रस्त मुद्दे काढायची गरज नाही. आपली लढाई ही भाजपशी आहे. त्यामुळे विनाकारण अशा मुद्द्यांत अडकण्याची आवश्यकता नव्हती, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा सल्ला तुम्ही नितीन राऊत यांना देणार का, या प्रश्नावर त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून माझा सर्वांनाच हा सल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News Mumbai
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले

स्वबळावर लढल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता टिकणार नाही :

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढलो. स्थानिक आघाड्या आणि युती यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. काँग्रेस कार्यकर्ता टिकवायचा असेल तर स्वबळाशिवाय पर्याय नाही. तसे पक्षश्रेष्ठींनी मला सांगितले आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com