Ajit Pawar : झुकेगा नही, भाईजींना कॅबिनेट मंत्रीच करायचं! अजितदादांनी ठासून सांगितलं

Narendra Modi oath taking ceremony : काल (शनिवारी) रात्रीच आमच्यासोबत संपर्क साधला होता. राजनाथ सिंह, जे पी नड्डा यांच्यासोबत आमची बैठक झाली, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Modi 3.0 cabinet : दिल्लीमध्ये मोदी-3 सरकारचा आज (रविवारी) शपथविधी होतो आहे. मात्र, या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून कोणीच शपथ घेणार नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्रीपदावरून सुनील तटकरे प्रफुल पटेलांमध्ये वाद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद हवे असल्याने या शपथविधीत राष्ट्रवादीकडून कोणी शपथ घेत नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, काल (शनिवारी) रात्रीच आमच्यासोबत संपर्क साधला होता. राजनाथ सिंह, जे पी नड्डा यांच्यासोबत आमची बैठक झाली. आमचा लोकसभेत एकच उमेदवार जिंकला असला तरी पुढील दोन तीन महिन्यात अजून तीन जण राज्यसभेवर येतील. त्यामुळे आमची संख्या चार होणार आहे. त्यामुळे आम्ही एक कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली.

आम्हाला निरोप देण्यात आला की स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आम्हाला देण्यात येणार. प्रफुल पटेल यांनी कॅबिनेट मंत्रीपदी काम केले असल्याने राज्यमंत्रीपद घेणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे काही काळ आमची थांबायची तयारी आहेत, असे आम्ही कळवले, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे प्रफुल पटेल यांच्या कॅबिनेट पदासाठी राष्ट्रवादीने थांबायची तयारी दाखवल्याचे स्पष्ट होते आहे.

Ajit Pawar
PM Modi oath ceremony LIVE: Modi 2.0 मधील स्मृती इराणी, अनुराग ठाकुर, दानवे यांच्यासह 20 जणांचा Modi 3.0 मधून पत्ता कट

कॅबिनेट मंत्रिपद मिळणार?

शिंदे साहेबांचा, आमच्या पक्षाला एकच सूचना केली. त्यामध्ये त्यांच्या मनात भेदभाव करण्याचा कुठलाही उद्देश दिसत नाही. त्यांनी आम्हाला काही भरोसा दिला आहे. राज्यमंत्रीपद घेणं आम्हाला योग्य वाटलं नाही.

आम्हाला नाकारलं होतं. आम्हाला द्यायचं नव्हते असे काही नाही. काही काळ आम्ही थांबायचा निर्णय घेतलाय, असे सांगत प्रफुल पटेलांनी पुढे राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com