Nawab Malik News : नवाब मलिक यांनी सुनील तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची घेतली भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Nawab Malik meet Sunil Tatkare and Prafull Patel : नवाब मलिक अपक्ष लढणार या राजकीय वर्तुळातील चर्चांचा पार्श्वभूमीवर आता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Nawab Malik and NCP News : आमदार नवाब मलिक यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मंत्रालयासमोर असणाऱ्या कार्यालयात तिन्ही नेत्यांची महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे. नवाब मलिक अपक्ष लढणार या राजकीय वर्तुळातील चर्चांचा पार्श्वभूमीवर आता या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

कारण, दोन दिवस आधीच पत्रकारांसोबतच्या अनौपचारीक गप्पांदरम्यान नवाब मलिक आमच्याच सोबत असल्याचा राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून दावाही केला गेला होता.

आगामी विधानसभा निवडणूक जवळजवळ येत आहे, तसा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असणार असल्याचं बोललं जात आहे. कारण, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीस नवाब मलिकांची उपस्थिती होती.

Nawab Malik
Nitesh Rane: नवाब मलिक हा माझा टास्क नाही; भाजप आमदार नीतेश राणे असे का म्हणाले...

नवाब मलिकांच्या या उपस्थितीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. आता फडणवीसांना नवाब मलिक महायुतीमध्ये चालणार आहेत का? असा विरोधकांचा सवाल होता. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक नवाब मलिक अपक्ष लढून नंतर अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादीला पाठिंबा देतील असा एकंदरीत अंदाज वर्तवला जात आहे.

"अजितदादा यांची नवाब मलिक यांच्यावरून आता फसगत झाली आहे. त्यावर ते कसे मार्ग काढतात आता हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल आणि मजा येईल", असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे.

Nawab Malik
Bacchu Kadu : नवाब मलिक यांच्यामुळे अजितदादांची फसगत, मजा येणार आहे; बच्चू कडू असे का म्हणाले....

नवाब मलिक देशद्रोहाच्या आरोपांमध्ये काही काळ तुरुंगात देखील होते. वैद्यकीय पेरोलवर सुटलेले नवाब मलिक यांनी नागपूर अधिवेशनात देखील हजेरी लावली होती. परंतु ते तेथे तटस्थ होते. यानंतर त्यांनी एकटेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (Ajit Pawar) गट यांच्या कार्यालयात हजेरी लावली. तेथून परतत असताना देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे आमने-सामने आले होते. याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

पुढे मुंबई पावसाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधिमंडळात हजेरी लावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आयोजित केलेल्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीसही नवाब मलिक हजर होते. त्यामुळे नवाब मलिक हे अजितदादा बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. यावरून विरोधकांमध्ये चर्चेला पेव फुटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com